Shivrayancha Chhava चा टीझर रिलीज, ‘या’ अभिनेत्याने साकारले शंभूराजे

Shivrayancha Chhava चा टीझर रिलीज, ‘या’ अभिनेत्याने साकारले शंभूराजे

Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्पाल लांजेकार यांच्या ‘शिवराज अष्टक’ने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही मराठी सिनेमाना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Movie) सिनेमांमध्ये आता चाहत्यांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा (Shivrayancha Chava ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Manoj Jarange : मराठा समाजात फूट पाडण्यासाठी ट्रॅप, त्यांची नावे जाहीर करू; जरांगेंचा इशारा

या टीझरबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना रयतेच्या रक्षणाच्या जबाबदारीचे महत्त्व समजावून सांगत आहेत. तर अभिनेता भूषण पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर आणि भूषण पाटील यांनी चित्रपटाचा हा दुसरा टीझर सोशल मीडियावर शेअर केला ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, जयांच्या ध्वनीने उसळती सह्याद्री आणि समुद्र रायगडी बैसले सिंहासनी गर्जती रुद्र ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!

Budget 2024 : अर्थसंकल्पात मालदीव होणार ‘चेकमेट’ लक्षद्विपसाठी खास प्लॅन

तसेच छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा मराठी आगामी चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 पासून फक्त चित्रपटगृहात भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसाखाली या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली होती. दिग्दर्शकांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत सिनेमाचा प्रोमो शेअर केला होता.

राज्यातील 28 टक्के नागरिक नैराश्याग्रस्त; कोल्हेंनी वेधलं लक्ष

या सिनेमाने जागतिक स्तरावर रिलीजच्या अगोदरच एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअरवर या मराठी सिनेमाचे पोस्टर झळकले आहे. हा विक्रम करणारा ‘शिवरायांचा छावा’ हा पहिला मराठी सुपरहिट सिनेमा ठरला जाणार आहे. ‘शिवरायांचा छावा’चे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीने सोशल मीडियावरुन ही गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचा टीझर टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे…”

‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, विक्रम गायकवाड, अमित देशमुख, भूषण विनतरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी बघायला मिळणार आहेत. सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांचा न उलगडलेला इतिहास आपल्याला सिनेमात बघायला मिळणार आहे. सिनेमा आगामी वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज