राज्यातील 28 टक्के नागरिक नैराश्याग्रस्त; कोल्हेंनी वेधलं लक्ष

राज्यातील 28 टक्के नागरिक नैराश्याग्रस्त; कोल्हेंनी वेधलं लक्ष

Amol Kohle : कोरोनानंतर (Coronavirus) मानसिक आजाराच्या समस्या (Mental problem) वाढल्या आहेत. यासाठी सरकारने ‘टेलीमानस हेल्पलाइन’ची (Telemanus Helpline) सुरुवात केली आहे. या हेल्पलाइनवर वर्षभरात 50 हजारांहून अधिक कॉल्स आले आहेत. जर आपण डेटा पाहिला तर, दररोज प्राप्त होणाऱ्या 137 कॉलपैकी सर्वाधिक 38 कॉल नैराश्याने ग्रस्त रुग्णांचे होते. याशिवाय 22 कॉल्स हे कामाच्या ठिकाणी तणावाखाली असलेल्या लोकांचे होते, 22 कॉल विविध चिंतेने त्रस्त असलेल्या नागरिकांचे होते.

यावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kohle) यांनी ट्वीट करत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील 28 टक्के नागरिक नैराश्याने ग्रस्त असल्याची आकडेवारी आपल्याला खडबडून जागं करणारी, विकासाच्या व्याख्येची पुनर्मांडणी करण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढं म्हटले आहे की, भारतातील नागरिक जर मानसिकदृष्ट्या सशक्त नसतील तर देश सशक्त होणे हे केवळ एक स्वप्नच असेल. “टेलीमानस” या राज्य सरकारच्या हेल्पलाईनवर मिळालेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे, खरी आकडेवारी कदाचित याहीपेक्षा जास्त असू शकते. व्यवस्था म्हणून मानसिक आरोग्य या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

रोहित पवारांकडून ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट; अजित पवार गटाचे टीकास्त्र

दरम्यान, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ऑक्टोबर 2022 मध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 24 तास टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक (14416) सुरू करण्यात आला. मानसिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या हेल्पलाइनवर वर्षभरात आलेल्या 50,000 हून अधिक कॉल्सपैकी केवळ 14,189 कॉल्स नैराश्याशी संबंधित आहेत.

‘काहीही हरकत नाही’: मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करण्याची आंबेडकरांची ऑफर जरांगेंनी स्वीकारली

याव्यतिरिक्त, 7,972 कॉल्स सामाजिक आणि कामाच्या ठिकाणी तणावाशी संबंधित होते. 7,885 कॉल्स विविध चिंताग्रस्त नागरिकांचे होते, 5,368 कॉल्स परीक्षेच्या ताणाबद्दल होते. अपयशाच्या भीतीने, नातेसंबंधातील समस्या आणि मानसिक स्थितीमुळे त्रस्त असलेल्या लोकांकडून 4,318 कॉल आले. हेल्पलाइनवर काही गैर-मानसिक आरोग्याशी संबंधित कॉल देखील आले आहेत.
Sonu Sood ने पुन्हा दिला मदतीचा हात वृद्ध नागरिकांसाठी केली ‘ही’ खास गोष्ट!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज