‘काहीही हरकत नाही’: मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करण्याची आंबेडकरांची ऑफर जरांगेंनी स्वीकारली

‘काहीही हरकत नाही’: मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करण्याची आंबेडकरांची ऑफर जरांगेंनी स्वीकारली

Manoj Jarange On Prakash Ambedkar : आम्ही प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) सल्ला कधीही ऐकलेलाच आहे, आमची काहीही हरकत नसून त्यांचा सल्ला आम्ही ऐकणार असल्याचं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगेंनी (Manoj Jarange ) स्पष्टच सांगितलं आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा वाद उफाळणार असल्याची शक्यता असल्याने आंबेडकरांनी मी मध्यस्थी करत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर बोलताना मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मनोज जरांगेंचे वादळ मुंबईच्या दिशेने अन् CM शिंदे मूळ गावच्या जत्रेसाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर

मनोज जरांगे म्हणाले, राज्यात सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसींमध्ये तणाव नाहीच. आम्ही गावखेड्यात आजही गुण्यागोविंदाने नांदतोयं. आम्ही प्रकाश आंबेडकरांचा सल्ला कधीही ऐकलेलाचं आहे, काहीही हरकत नाही. आम्ही त्यांचा सल्ला ऐकणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

तसेच आंबेडकरांनी जरांगेंना निजामी मराठ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला होता. त्यावरही जरांगे थेट भाष्य करीत म्हणाले, निजामी मराठे कोण आहेत, ते मला नाही माहित पण मी त्यांना खाजगीत विचारणार आहे. मी सावधच असून करोडो मराठ्यांनी माझ्यासारख्या लेकरावर विश्वास टाकला आहे त्यामुळे मी त्यांचा सल्ला ऐकून सावधच असल्याचं जरांगेंनी आंबेडकरांना सांगितलं आहे.

‘सत्ता येऊ द्या, तुमच्याच तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो’; उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना धमकावलंच

यासोबतच तुम्ही चार चौघात नाहीतर जनतेमध्ये जेवण करावं, असाही सल्ला प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना दिला होता. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले, आंबेडकरांना काय माहिती की मी चार लोकांमध्ये जेवतोयं मी जातोयं पहाटे, तोवर माझ्यासोबतचे बांधव झोपलेले असतात त्यामुळे मी चार चौघात जेवतच नाही. मी कधीही कुठंही जेवतो, उपोषणं केल्यामुळे माझ्या अंगात ताकद कमी झाली आहे, मला थंडी सहन होत नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

दरम्यान, पहाटेच्या दरम्यान सरकारसोबत काहीही चर्चा झालेली नाही. सरकारचं शिष्टमंडळ येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र ते पहाटेच्या दरम्यान आलेले नाहीत. पण ते आज येणार असल्याचा निरोप आयुक्तांनी आम्हाला दिला आहे. त्यामुळे आता जर शिष्टमंडळ आलं तर चर्चा होणार असल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले होते आंबेडकर?
राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा लढा सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावरुन आता ओबीसी नेते बबनराव तायवाडेही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आम्हीदेखील रस्त्यावर उतरणार असल्याचं विधान तायवाडे यांनी केलं आहे. त्यामुळे अशा परिस्थिती ओबीसी-मराठा वादात मी मध्यस्थी करण्यात तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हंटले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube