मी मध्यस्थी करतो; ओबीसी-मराठा वादात प्रकाश आंबेडकरांची उडी…
Prakash Ambedkar News : ओबीसी-मराठा वादात मी मध्यस्थी करतो, असं विधान करीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) ओबीसी-मराठा (Maratha-OBC) वादात उडी घेतली आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच रान पेटल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईला धडक घेणार असून दुसरीकडे ओबीसी नेते बबनराव तायडेंनीही रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केलीयं. त्यामुळे राज्यात आता मराठा-ओबीसी वादाची ठिणगी पेटणार असल्याची परिस्थिती असतानाच प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केलं आहे.
ग्रामीण अर्थकारणावर आता थेट केंद्र सरकारचा ‘वॉच’ : 12 हजार सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण सुरु
प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा लढा सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावरुन आता ओबीसी नेते बबनराव तायवाडेही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आम्हीदेखील रस्त्यावर उतरणार असल्याचं विधान तायवाडे यांनी केलं आहे. त्यामुळे अशा परिस्थिती ओबीसी-मराठा वादात मी मध्यस्थी करण्यात तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हंटले आहेत.
मोदी काही करणार नाहीत पण श्रेय घ्यायला पुढं येतील, भाजप नेत्याचा पीएम मोदींवर हल्लाबोल…
तसेच आंबेडरांनी यावेळी बोलताना मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूका होईपर्यंत निजामी मराठ्यांपासून सावध रहावं नाहीतर ते घात करतील, तसेच मनोज जरांगे यांनी 10 ते 15 लोकांमध्ये बसून जेवण न करता जनतेत बसून जेवण करावं हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं असल्याचा मोलाचा सल्ला आंबेडकरांनी जरांगेंना दिला आहे.
रोहित पवारांची ईडी चौकशी : शरद पवार शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत; भाजपला देणार ‘खास’ मेसेज
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. त्यावरही आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे मराठा आरक्षण नाकारलेलं नाही पण जी पद्धत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलीयं, त्या पद्धतीने न गेल्याने आरक्षण रद्द झालं आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे हे देता येतं अशी परिस्थिती असल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची पदयात्रा सुरु आहे. आंतरवली सराटी येथून निघालेली यात्रा सध्या पुण्यात असून पुण्यानंतर आता ही पदयात्रा थेट मुंबईत धडक घेणार आहे. या पदयात्रेत मनोज जरांगे यांच्यासह लाखोच्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले आहेत. या यात्रेला समाजबांधवांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.