‘लोकसभा निवडणूक लढा’; प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगे पाटलांना आवाहन

‘लोकसभा निवडणूक लढा’; प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगे पाटलांना आवाहन

Prakash Ambedkar Appeal to Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारी रोजी लाखो मराठा समाजबांधवासंह मुंबईकडे निघणार आहेत. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना खास आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला लढा देता येईल, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आपण राजकारणात कधीच येणार नाही असे याआधीच स्पष्ट केले आहे. राजकारणात येण्यापेक्षा हिमालयात निघून जाईन असे त्यांनी सांगितले होते.

प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवावी असे आवाहन केले. आंबेडकर पुढे म्हणाले, या गरीब मराठ्यांचा आवाज जो आज जरांगे पाटील रस्त्यावर उभा करत आहेत तो उद्याच्या लोकसभेत गेला पाहिजे. तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे. त्यांचं आंदोलन सुरू असताना ते या दृष्टीने विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी करत आहे, असे आंबेडकर म्हणाले.

मुंबईला जाणारचं! सगेसोयरे, कुणबी प्रमाणपत्राच्या मागण्यांवर मनोज जरांगे ठाम

मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईला निघणार आहेत. त्यांच्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. त्यांच्या आंदोलनावर सरकार अजूनही वेळकाढूपणा करत आहे. गेल्या 35 वर्षांपासून गरीब मराठ्यांचा लढा सुरू आहे. परंतु, इथल्या श्रीमंत मराठा वर्गाने (Maratha reservation) त्याला कधीही स्वरुप आणि आकार दिला नाही. परंतु, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्याला स्वरुप आणि आकारही मिळाला. गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण करायचं असेल तर आंदोलनाबरोबरच जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिकाही घेतली पाहिजे.

मनोज जरांगे पाटील यांना माझी लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024) लढण्याची सूचना आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत उतरावे. त्यानंतर सभागृहात आपला मुद्दा अधिक प्रकर्षाने मांडता येईल. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनात सर्व मराठा समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत..

जरांगेंच्या नेतृत्वामुळे श्रीमंत मराठा हादरला आहे. त्यामुळे जरांगेंचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे सरकारकडून सांगण्यात येणाऱ्या आकडे फसवे आहेत. ओबीसींना उचकवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. जरांगेंच्या पाठीमागे गरीब मराठ्यांनी पूर्णपणे उभं राहावं. मुंबईतील आंदोलनात गरीब मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आगामी निवडणुकींमुळे सरकारचा हात दगडाखाली असल्याचं जरांगेंनी लक्षात घ्यावं. जरांगेंनी येणाऱ्या लोकसभेत कुणाला पाठिंबा देण्याची भूमिका घेवू नये तर राजकीय भूमिका घ्यावी. त्यांना आरक्षणाचा मुद्दा जर मांडायचा असेल तर त्यांनी पार्लामेंटमध्ये यावं, असेही आंबेडकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube