Manoj Jarange: ‘मुंबईकडे कूच करण्याचा, मनोज जरांगेंनी सांगितला अॅक्शन प्लॅन
Manoj Jarange: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अखेर मुंबई येण्याचा प्लॅन जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. या आंदोलनाच्या दरम्यान अंतरवली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार आहे, या अॅक्शन प्लॅन संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मुंबईकडे कूच करत असताना किती लोक येणार? हे देखील अॅक्शन प्लॅन त्यांनी सांगितले आहे. मुंबईत आंदोलनास येण्यासाठी मनोज जरांगे 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून निघणार असल्याचे सांगितले आहे. सर्व मराठा शंभर टक्के मुंबई जाणार आहे. त्यांनी आपल्या खाण्या पिण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी अॅक्शन प्लॅनमध्ये सांगितले आहे.
पुढे मनोज जरांगे म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला आमचा मार्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. मोर्चात पुण्यातून जास्त सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी आम्ही संव्यसेवक घेतले नाही, प्रत्येकाने आपले नियोजन करायचे आहे. ज्या ठिकाणी मुक्काम आहे, त्याच ठिकाणी त्या मुक्काम स्थळाच्या शेजारी असलेल्या गावकऱ्यांकडून जेवणाची सोय होणार आहे. रोज साधारण 90-100 कि.मी चा प्रवास करायचा आहे. ‘ज्यांना शक्य आहे, त्यांनी चालायचं, आणि इतरांनी गाडीत प्रवास करायचा आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
Ahmednagar News : ज्यांना साखर कडू लागते, त्यांनी लाडू वाटावेत, सुजय विखेंचा विरोधकांना टोला
असा असणार मार्ग
20 जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव (पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
24 जानेवारी पाचवा मुक्काम- (लोणावळा)
25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
26 जानेवारी 7 मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी