Ahmednagar News : ज्यांना साखर कडू लागते, त्यांनी लाडू वाटावेत, सुजय विखेंचा विरोधकांना टोला
Sujay Vikhe : आगामी काळात राज्यात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. त्यात भाजपचे खासदार सुजय विखेही (Sujay Vikhe) मागे नाहीत. त्यांचे आपल्या मतदारसंघात मोफत साखर वाटपाचे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला होता. आता पुन्हा त्यांनी जनसंपर्कासाठी साखर वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यावरून विरोधक त्यांच्यावर जोरदार करताहेत. दरम्यान, आता विरोधकांच्या टीकेला सुजय विखेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
उद्धव ठाकरे-शरद पवार म्हणजे विक्रम वेताळची जोडी, मंत्री विखेंची खोचक टीका
मोफत साखर वाटपातून आमचा राजकारण करण्याचा कोणताही प्रयत्न नाही. आमची साखर ज्यांना कडू लागत असेल त्यांनी जनतेला मोफत लाडू वाटावेत, त्याला आमचा आक्षेप असण्याचे कारण नाही, असं विखे म्हणाले. पुढं बोलतांना ते म्हणाले, शेवगाव शहरातील जे कुटुंबीय २२ जानेवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साह साजरा करेल, त्या प्रत्येक प्रभागातील एका कुटुंबातील दोन सदस्यांना अयोध्या दर्शन घडविण्याचे विखे यांनी जाहीर केले.
उद्धव ठाकरे-शरद पवार म्हणजे विक्रम वेताळची जोडी, मंत्री विखेंची खोचक टीका
आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात तसेच मिरी रस्त्यावरील ममता लॉन्स येथे पार पडलेल्या मोफत साखर व हरभरा डाळ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमास शहराच्या विविध प्रभागातील नागरिकांची मोठी गर्दी होती.
खा विखे म्हणाले, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, लोकनेते बाळासाहेब विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विखे पाटील परिवारावर जनतेने सतत प्रेम केले असून आम्ही देखील जनतेचा विश्वास प्राप्त केला आहे. आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनता सुखी व आनंदी राहावी, अशीच लोकप्रतिनिधीची भावना असते. त्यामुळे साखर वाटपाचा उपक्रम राबविला आहे. त्यामागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आ. राजळे म्हणाल्या, पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यात आले आहे, त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापित होत आहे. हा सोहळा जनतेच्या दृष्टीने आनंदाचा क्षण असल्याने त्या सोहळ्यासाठी प्रत्येक घरातून डाळीचे लाडू प्रसाद म्हणून गेले पाहिजेत. या हेतूने जनतेला साखर आणि डाळीचे वाटप करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
यावेळी विविध प्रभागातील नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, माजी नगरसेवक महेश फलके, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, प्रा. नितीन मालानी, बाळासाहेब कोळगे, गणेश कोरडे, राहुल बंब, नवनाथ फासाटे यांच्यासह विविध प्रभागातील नागरिक उपस्थित होते.