सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार, कॉपी पुरवणाऱ्या दोन TCS कर्मचाऱ्यांवर गुन्हा

  • Written By: Published:
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार, कॉपी पुरवणाऱ्या दोन TCS कर्मचाऱ्यांवर गुन्हा

A Case Registered Against TCS Employee : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिये गैरप्रकार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. कधी पेपरपुटीचे (Paper Leak) प्रकार घडतात, तर कधी परीक्षार्थ्यांनी कॉपी पुरवण्याचे प्रकरणात घडतात. आरोग्य विभाग, म्हाडा, शिक्षण विभाग, वनविभागातील तील पेपर फुटीचे प्रकरणं राज्यभर गाजली होती. अशातच आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेदरम्यानही (Examination of Public Works Department) गैरप्रकार झाल्यानं दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

आयकर विभागात नोकरीची संधी, दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज, महिन्याला पगार १ लाख ४२ हजार 

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पेपर झाले. या परीक्षेदरम्यान लातूरमधील एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आला. त्याप्रकरणी ‘टीसीएस’ कंपनीच्याच दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. विशेष म्हणजे, तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत एका टीसीएस कर्मचाऱ्याच्याच जवळच्या नातेवाईकांची नावे असल्याचे निदर्शनास आलं होतं.

लोकप्रिय उर्दू शायर मुनव्वर राणा यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी मालवली प्राणज्योत 

लातूर पोलिसांनी तपास करून प्राथमिक तपास अहवाल सादर केला आहे. या आधारे परीक्षा केंद्रांवर कॉपीचा पुरवठा करणाऱ्या टीसीएस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांच्या तक्रारीवरून ही बाब समोर आल्याचं समजतं. तर लातूरच्या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीतही गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाला दिलेल्या निवेदनात केला होता. त्यामुळे सर्व परीक्षा ‘एमपीएससी’च्या माध्यमातून घेण्यात याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

तलाठी भरतीच्या यादीत त्रुटी

तलाठी भरती परीक्षेच्या निकालातील कथित गोंधळात एका TCS कर्मचाऱ्याचे नाव पुढे येत आहे. या परीक्षेत परीक्षेशी काहीही संबंध नसलेल्या टॅक्सी चालक आणि गृहिणीला या अनुक्रमे 208 आणि 198 गुण कसे मिळाले, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे. हे दोन्ही उमेदवार ठाणे जिल्ह्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असून ते टीसीएस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याचा आरोप समितीने केला.

दरम्यान, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी सांगितले की, लातूरमधील एका परीक्षा केंद्रावरून तलाठी भरती परीक्षेत शंभर ते दोनशे उमेदवारांची निवड होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीएत ‘टीसीएस’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच गडबड केल्याचं उघड झालं. त्यामुळं राज्य सरकारने सीसीटीव्हीची चौकशी करून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज