Indian Amry कडून अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल

Indian Amry कडून अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाकडून (Indian Amry) अग्निवीर (Agniveer)भरती प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलाय. आता मानसिक स्वास्थ (mental health)आणि शारीरिक स्वास्थाचा (Physical health)योग्य समतोल राखण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल केल्याची माहिती समोर आलीय. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.22) याबाबतची माहिती दिलीय.

अग्निवीर भरती प्रक्रिया (Agniveer Recruitment Process) आता नवीन निकषांवर होणारंय. त्यामध्ये शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ असणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाणारंय. त्यासाठी लेखी प्रवेश परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

Earthquake : सीरिया-तुर्कीनंतर आता पूर्व ताजिकिस्तानमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप

भारतीय लष्कराकडून भरती प्रक्रियेत बदल केल्याची माहिती देत सांगितलं की, मानसिकदृष्ट्या मजबूत उमेदवारांची निवड करण्यावर भर दिला जाणारंय. लष्करातील भरती प्रक्रियेतील अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी बुधवारी सांगितलं की, सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर शेवटी लेखी परीक्षा घेतली जायची. आता मात्र लेखी परीक्षा ही भरती प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. भरती होणारे उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत का? हे महत्त्वाचं असणारंय. लेखी परीक्षेनंतर शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणारंय.

कर्नल सुरेश यांनी सांगितलं की, भरती प्रक्रियेत आणखी एक मोठा बदल करण्यात आलाय. लेखी परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावं लागणारंय. या रकमेपैकी 250 रुपये भारतीय सैन्य देणार आहे. तर उमेदवाराला फक्त 250 रुपये भरावे लागणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube