राष्ट्रगीतापूर्वी वाजवले जाणार वंदे मातरम्; 3 मिनिटे 10 सेकंद उभे राहणे बंधनकारक; मोठे आदेश निघाले

गृह मंत्रालयाने 'वंदे मातरम' बद्दल नवी नियमावली जाहीर केली आहे. राष्ट्रगीताच्या आधी पूर्ण ३ मिनिट १० सेकंदाचे 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत वाजवले जाईल.

  • Written By: Published:
मोठी बातमी! राष्ट्रगीतापूर्वी वाजणार वंदे मातरम; उभे राहणे बंधनकारक; गृहमंत्रालयाचे मोठे आदेश

Vande Mataram Mandatory At Official Events Know About Government’s New Guidelines : वंदे मातरम गीताबाबात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार, वंदे मातरमसाठी उभे राहणे अनिवार्य असणार आहे. सरकारी कार्यक्रमांमध्ये 3 मिनिटे 10 सेकंदांचे, सहा पद्यांचे वंदे मातरम गाणे अनिवार्य करण्यात आले असून, 10 पानांच्या आदेशात जर, राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् एकाच वेळी गायले गेले तर, प्रथम वंदे मातरम् वाजवले जाईल असेही स्पष्ट केले आहे. याबाबत सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, मंत्रालये आणि संवैधानिक संस्थांना एक सूचना जारी करण्यात आली आहे.

Vande Mataram

वंदे मातरम् गीताला 150 वर्ष पूर्ण

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वपूर्ण गीत ‘वंदे मातरम’ला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने केंद्र सरकारकडून देशभरात विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. याचाच भाग म्हणून नवी नियमावली जाहीर केली असावी, असे सांगितले जात आहे.

गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना काय?

नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, जर ‘वंदे मातरम्’ कोणत्याही सरकारी किंवा अधिकृत कार्यक्रमात गायले किंवा वाजवले गेले तर त्याची पूर्ण सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल. त्यामुळे आता सहा कडवी असलेल्या वंदे मातरमचे 3 मिनिटं 10 सेकंदाचे गायन करावे लागणार आहे. यापूर्वी वंदे मातरमची दोन कडवी गायली जात होती, ज्यासाठी 65 सेकंदाचा वेळ लागत होता. जर, एखाद्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ दोन्ही सादर केले गेले तर, प्रथम ‘वंदे मातरम्’ सादर केले जाईल आणि त्यानंतर ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत सादर केले जाईल. झेंडा वंदन, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण आणि राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी राष्ट्रीय गीत वाजवले जाणार आहे.

Digital Gold : जानेवारीत ग्राहकांची UPI वरून रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी; नोंदवला गेला नवा विक्रम

वंदे मातरम्’ कधी वाजवले जाईल?

नागरी सन्मान सोहळे: पदवीदान किंवा इतर सरकारी पुरस्कार सोहळ्यांच्या वेळी.
व्हीव्हीआयपी आगमन: राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी.
राष्ट्रपतींचे संबोधन: आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरून राष्ट्रपतींचे भाषण सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर.
ध्वजारोहण: परेडमध्ये राष्ट्रीय ध्वज नेला जात असताना किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात ध्वजारोहण करताना.

‘वंदे मातरम’चा थोडक्यात इतिहास

‘वंदे मातरम’ हे गीत सर्वप्रथम बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून 7 नोव्हेंबर 1875 रोजी प्रसिद्ध झाले. तेव्हापासून हे गीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गजर बनले. 1896 मध्ये रवींद्रनाथ ठाकुर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत गायले गेले. त्यानंतर ते अधिकच लोकप्रिय झाले. विशेष म्हणजे, 1905  मध्ये बंगालच्या फाळणीविरोधात ‘वंदे मातरम’ हे गीत एका महत्त्वाच्या साधनासारखे वापरले गेले. 24 जानेवारी, 1950 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत निवेदन करताना स्वातंत्र्य लढ्यातील ‘वंदे मातरम’चे महत्त्व लक्षात घेता त्याला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच दर्जा असेल आणि तितकाच सन्मान केला जाईल, असे म्हटले होते. तेंव्हापासून ‘वंदे मातरम ’ला राष्ट्रगीताप्रमाणेच सन्मान प्राप्त झाला.

follow us