Earthquake : सीरिया-तुर्कीनंतर आता पूर्व ताजिकिस्तानमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप
नवी दिल्ली : ताजिकिस्तानमध्ये (Eastern Tajikistan) गुरुवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने कळवले की ताजिकिस्तानमध्ये सकाळी 6.07 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.3 इतकी होती. माहितीनुसार, त्याचे केंद्र मुरगोबपासून 67 किमी पश्चिमेला होते.
चीनने ताजिकिस्तानच्या (Tajikistan ) सीमेजवळ 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद केली आहे. चीनच्या सरकारी टेलिव्हिजन सीसीटीव्हीने गुरुवारी सांगितले की, चीनच्या झिनजियांग प्रदेश आणि ताजिकिस्तानच्या सीमेजवळ सकाळी 7.3 तीव्रतेचा भूकंप झाला.
सीसीटीव्हीने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू चीनच्या जवळच्या सीमेपासून 82 किमी अंतरावर होता. भूकंपाचा हादरा इतका जोरदार होता की शिनजियांग प्रदेशाच्या पश्चिमेकडील काशगर आणि आर्टॅक्समध्येही त्याचे धक्के जाणवले. सीसीटीव्हीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 5 किमी खाली होता, तेथून सरासरी उंची सुमारे 4,655 मीटर (15,300 फूट) आहे.
तुर्कीत भयाण परिस्थिती
दरम्यान 6 फेब्रुवारी रोजी तुर्कस्तान आणि शेजारील सीरियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 मोजली गेली. एक-दोन दिवसांनंतरही अनेक वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 41,000 च्या पुढे गेली आहे. तर लाखो लोक या भूकंपामध्ये जखमी झाले आहे. अनेक इमारती कोसळल्याने नागरिक बेघर झाले आहे.
IND W vs AUS W T20 : भारतासाठी आज ‘करो या मरो’ सामना
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे बराच विध्वंस झाला. सरकारी आकडेवारीनुसार, तुर्कस्तानमधील भूकंपातील एकूण मृतांची संख्या 40,689 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, सीरियातील मृतांची आकडेवारी जोडली तर ही संख्या 45,000 वर गेली आहे.