आयकर विभागात नोकरीची संधी, दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज, महिन्याला पगार १ लाख ४२ हजार

  • Written By: Published:
आयकर विभागात नोकरीची संधी, दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज, महिन्याला पगार १ लाख ४२ हजार

Income Tax Recruitment 2024 : आज अनेक जण सरकारी नोकरी (Govt job मिळवण्याच्या शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं हे फार कठीण झालं. दरम्यान, तुम्ही पदवीधर असाल किंवा १० वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला थेट आयकर विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. कारण आयकर विभागाने (Income Tax) इन्स्पेक्टर, एमटीएस आणि इतर पदांसाठी बंपर भरती जाही केली आहे.

देशात पुढील तीन दिवस थंडीची लाट, तर आज ‘या’ भागात कोसळणार अवकाळी पाऊस; IMD चा अंदाज 

पात्र उमेदवार प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट, incometaxmumbai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमदेवारांना क्त ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी उमेदवारांना दिलेल्या मुदतीत अर्ज करावा लागेल. महत्वाची बाब म्हणजे, उशीरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

291 पदांवर बंपर भरती
स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि इतर काही पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून 291 पदे भरली जाणार आहेत. जे खरोखर नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या साइटला भेट देऊ शकता. तेथे तुम्हाला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल.

Prajakta Gaikwad : प्राजक्ताने केले नवं फोटोशुट, गुलाबी गाऊनमध्ये खुललं सौंदर्यं. 

रिक्त जागा तपशील-
आयकर निरीक्षक: 14 पदे
स्टेनोग्राफर : 18 पदे
कर सहाय्यक: 119 पदे
मल्टी टास्किंग स्टाफ: 137 पदे
कॅन्टीन अटेंडंट: 3 पदे

शैक्षणिक पात्रता
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी पदानुसार मॅट्रिक किंवा समकक्ष किंवा 10+2 किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, क्रीडा कोटा अंतर्गत असणे आवश्यक आहे.

वय श्रेणी
या भरती अंतर्गत विविध पदांनुसार, उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25/27/30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज फी
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹ 200/- आहे. फी फक्त ऑनलाइन भरायची आहे आणि अर्जासोबत पैसे भरल्याचा पुरावा सादर करायचा आहे. अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

पगार :
आयकर निरीक्षक : स्तर 7 नुसार र, 44, 900 ते 1,42,400
स्टेनोग्राफर ग्रेड-2 (स्टेनो): लेव्हल 4 नुसार रु. 25,500 ते रु. 81,100
कर सहाय्यक पदासाठी: स्तर 4 नुसार रु. 25,500 ते रु. 81,100
मल्टी-टास्किंग स्टाफ पोस्टसाठी: स्तर 1 नुसार रु. 18,000 ते रु. 56,900
कॅन्टीन अटेंडंटच्या पदासाठी: स्तर 1 नुसार रु. 18,000 ते रु. 56,900

अधिसूचना –
https://www.incometaxmumbai.gov.in/pdf/sports-recruitment.pdf

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज