आपला अभिनय पडद्यावर दाखवा, पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर नाही; सुजय विखेंचा कोल्हेंना खोचक टोला

  • Written By: Published:
आपला अभिनय पडद्यावर दाखवा, पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर नाही; सुजय विखेंचा कोल्हेंना खोचक टोला

अहमदनगर : कांद्याची (Onion) देशामध्ये उपलब्धता वाढावी तसेच, कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आहे. मात्र कांदयाला चांगला भाव मिळत असताना केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव (Onion prices) कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक झालं. दरम्यान, खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kohle)) कांदा प्रश्नाबाबत शासनाने काहीतरी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावी, अशी मागणी केली. त्याला आता खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe) प्रत्युत्तर दिलं.

Sunny Leone करणार नव्या इंडस्ट्रीत प्रवेश; सांगितला ‘चिका लोका’ च्या ग्रॅंड ओपनिंगचा किस्सा 

पत्रकारांच्या कॅमेरासमोर अभिनय करून चालत नाही. जनतेला अमोल कोल्हे यांची वास्तविकता माहित आहे, असा टोला विखे यांनी लगावला.

आज खासदार सुजय विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, कांदा प्रश्नाबाबत शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा, कांदा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली. त्याविषयी विचारले असता विखे म्हणाले की, खासदार अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेते आहेत. पत्रकार देखील त्यांना पत्रकार परिषदेच्या अगोदर ॲक्शन असं म्हणत असतील आणि मगच ते बोलत असतील. मात्र माझी त्यांना विनंती असेल की तुम्ही रुपेरी पडद्यावर आपला अभिनय करावा. पत्रकारांच्या कॅमेरासमोर अभिनय करून चालत नाही. जनतेला अमोल कोल्हे यांची वास्तविकता माहित आहे, असा टोला विखे यांनी लगावला.

Sharad Pawar यांनी अतुल बेनकेंना पर्याय शोधला? काँग्रेस युवा नेते म्हटले पवारांनी संधी दिल्यास… 

गेल्या काही दिवसांपासून कोल्हे चांगलेच सक्रीय झाले. हाच धागा पकडून पुढं बोलतांना विखे म्हणाले की, गेली साडेचार वर्ष खासदार कोल्हे हे घोड्यावरच होते. आता कुठे ते खाली उतरले आहे आणि फिरू लागले आहेत. मात्र जनता त्यांना पुन्हा एकदा घोड्यावरच बसवणार मला पूर्ण विश्वास आहे, असंही खा. विखे म्हणणाले.

कांदा निर्यातबंदी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न, दुध उत्पादकांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता. शेतकरी आक्रोश मोर्चात बोलतांना अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांना शेतकरी प्रश्नांवर सरकावर चांगलीच टीका केली होती. शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली होती. अजित दादांचा एवढा दरारा असेल तर त्यांनी केंद्र सरकारला बोलावं अन् कांदा बंदी उठवावी, असंही कोल्हे म्हणाले होते.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज