Maratha Reservation : जरांगेच्या पदयात्रेचा नगर जिल्ह्यातील मार्गक्रम ठरला; असे असणार नियोजन

Maratha Reservation : जरांगेच्या पदयात्रेचा नगर जिल्ह्यातील मार्गक्रम ठरला; असे असणार नियोजन

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation ) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर आता जरांगे हे आता मुंबईकडे आगेकूच करणार आहे. त्यांची ही पदयात्रा नगर जिल्ह्यातून देखील जाणार आहे. त्यानुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने मराठा बांधव या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहे.

India Maldives Tension : भारतीयांचा झटका! फक्त 3 दिवसांत ‘इतक्या’ मालदीव टूर रद्द

मनोज जरांगे हे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढत आहे. त्यांनी उपोषण केले मात्र सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यांनतर त्यांनी राज्यव्यापी दौरा केला मराठा बांधवांची भेटीगाठी घेतल्या यावेळी त्यांनी सामान बांधवांशी चर्चा देखील केली. सरकारकडून आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय न घेण्यात आल्याने व आश्वासनाची पूर्तता न झाल्याने जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

‘प्रभू श्रीराम मांसाहारी होते’, सिनेमातील डायलॉगवरून नयनताराविरोधात एफआयआर दाखल

मराठाआरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील त्यांच्या अंतरवाली सराटी या गावापासून 20 जानेवारी रोजी पदयात्रा काढणार आहेत. ही पदयात्रा जालना, बीड, आणि अहमदनगर जिल्ह्यातून पुणे मार्गे मुंबई येथे आझाद मैदानावर पोहोचणार आहे. मुंबई येथे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत.

असा असणार पदयात्रेचा मार्ग

पदयात्रा बीड जिल्ह्यातून गेवराई मार्गे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पाथर्डी मार्गे ही पदयात्रा नगर शहरातून जाणार आहे. नगर शहरातून जात असताना अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण 14 तालुक्यातून सर्व मराठा बांधव अहमदनगर शहरात या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच या पदयात्रेत सहभागी झालेल्या लाखो मराठा बांधवांची सेवा करण्यासाठी सर्व 14 जिल्ह्यातील मराठा बांधव नगर शहरात उपस्थित राहणार आहे.

जालना बीड आणि इतर जिल्ह्यातून या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या बांधवांची सेवा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील मराठा बांधवांनी एक लाख लोक जेवतील असे नियोजन हाती घेतले आहे. जेवण, राहण्याची सोय ,पाणी व इतर काही गोष्टींबाबत चर्चा करण्यात आली त्यासाठी स्वयंसेवकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज