मोदी काही करणार नाहीत पण श्रेय घ्यायला पुढं येतील, भाजप नेत्याचा पीएम मोदींवर हल्लाबोल…

मोदी काही करणार नाहीत पण श्रेय घ्यायला पुढं येतील, भाजप नेत्याचा पीएम मोदींवर हल्लाबोल…

Subramanian Swamy : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy)यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi)घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं (ayodhya ram mandir)लोकार्पण पार पडलं. त्यानंतर आज सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. या कार्यक्रमात देशभरातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

Shilpa Shetty चा स्टायलिश विंटर लूक पाहिला? तुम्हीही कराल फॉलो

सुब्रमण्यम स्वामी यांनी आज मंगळवारी (दि.23) ट्वीट करुन त्यात म्हटलंय की, ज्ञानवापी काशी विश्वनाथ मंदिर आणि कृष्णजन्मभूमी मथुरा मंदिराच्या जीर्णोद्धाराची परवानगी देण्यासाठी आपली प्रलंबित जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहे.


न्यायालयाचा दरवाजा पुन्हा ठोठावणार असल्याचे त्यांनी म्हटले. आता मोदी यामध्ये काही करणार नाहीत, पण श्रेय घेण्यासाठी ते नक्की पुढे येतील,असं म्हणत थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Shiv Chhatrapati Award : ‘त्या’ सात खेळांचा ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्कारात पुन्हा समावेश

सुब्रमण्यम स्वामी हे अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपमधल्याच अनेक नेत्यांवर टीका करताना पाहायला मिळतात. ते भाजप नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतात. त्याचबरोबर भाजपच्या अनेक नेते, मंत्र्यांना राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं होतं, पण सुब्रमण्यम स्वामी यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. त्याबद्दलही स्वामींनी नाराजी व्यक्त केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube