‘सत्ता येऊ द्या, तुमच्याच तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो’; उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना धमकावलंच

‘सत्ता येऊ द्या, तुमच्याच तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो’; उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना धमकावलंच

Udhav Thackeray News : सत्ता येऊ द्या तुमच्याच तंगड्या तुमच्या घालतो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशीच आज नाशिकच्या हुतात्मा कान्हेरे मैदानात ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. यावेळी जाहीर सभेतून उद्धव ठाकरे बोलत होते.

महिला आरक्षण फक्त गाजरच; भाजप नेत्यांचा ‘अर्धवट’ उल्लेख करत अंधारेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे म्हणाले, आमचा राम मंदिराला विरोध नाही.. त्या काळात शिवसैनिकांनी जे केलं आहे ते आजच्या शेंबड्या लोकांना माहिती पण नाही. त्यावेळी भाजपचे वाजपेयी अडवाणींपर्यंत सर्वांनीच पळ काढला होता. कोणीही जबाबदारी घेत नव्हतं. पण बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्विकारली होती. आज विचारतात की शिवसेनेचे योगदान काय? त्यांची आज आमच्या योगदानापर्यंत मजल गेलीयं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाकडून श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात अन् अभिनव पद्धतीने साजरा

शंकराचार्य़ांचं हिंदु धर्मात योगदान काय इथपर्यंत मजल गेली आहे. तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मानत हा सवाल आहे. मानत असाल तर जे बाजारबुनगे आयाराम भरलेले आहेत. तुम्हाला कसली घाई होती राम नवमीपर्यंत थांबले असतेत तर काय झालं असतं. भाजपच्या राज्यात शंकराचाऱ्यांचा अपमान अन् भ्रष्टाचाऱ्यांचा सन्मान होत आहे. राम मंदिरासाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता.

आंदोलन पुण्यात येण्यापूर्वीच मेणाचा पुतळा, बच्चन-तेंडुलकरनंतर मनोज जरांगेंचा सन्मान

काश्मीरचं 370 कलम काढण्यासाठीही दिला होता. हिंदुंचं रक्षण करण्यासाठी पाठिंबा दिला होता. जे कार्यकर्ते माझ्याकडे ते भाजपकडे नाहीच. ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे,. मी वारसा घेऊन पुढे चाललोय. भाजपकडे असा एकही कार्यकर्ता नाही. दंगल झाली कीआतमद्ये शेपूट घालून पळणारी ही अवलाद असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

सत्ता येताच तुमच्याच गळ्यात तंगड्या…
शिवसैनिकांच्या घरी ईडी, सीबीआय, इनकमटॅक्स धाडी टाकतात. धाडीमध्ये घरं आमचं अन् हे पाय ताणून बसतात. येऊ द्या सत्ता तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही पाहा. तुमच्या बंदोबस्तात असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार जनतेच्या पैशातून दिला जात आहे. भाजपने आता भेकाड जनता पार्टी असं नाव ठेवा. भाजप ही भेकडांची पार्टी असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज