श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाकडून श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात अन् अभिनव पद्धतीने साजरा
पुणे : अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे हा सोहळा द्विगुणित झाला. (Shriram Pratishtapana Sohla was celebrated with gaiety on behalf of ‘Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal’.)
पुण्यातही भारतातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या’ वतीने श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तीन दिवस रामरक्षा स्तोत्र पठण, रामनाम जप, महाआरती अशा विविध कार्यक्रमांसोबतच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून शहरातील सहा प्रमुख राम मंदिरात मानाचे ताट देण्यात आले.
मराठ्यांचं वादळ पुण्याकडे : अहमदनगरकडे जाणारी सर्व वाहतूक वळवली !
यानंतर बोलताना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना होणे ही देशभरातील कोट्यवधी भाविकांसोबतच आपल्या सर्वांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. हा आनंद द्विगुणित व्हावा आणि शहरातील श्रीरामाच्या काही प्रमुख मंदिरांना मानाचे ताट देता यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ मार्फत हा कार्यक्रम घेता आला याचे समाधान आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.
तीन दिवस विविध कार्यक्रम :
अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या प्रतिष्ठापना यानिमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीने रविवार ते मंगळवार या तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण व रामनाम जप करण्यात आला, तसेच सकाळी साडेआठची आरती कारसेवक संजय गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना होताच मंदिरासमोर श्री समर्थ पथकाने वादन करत ढोल ताशाचा गजर केला. यावेळी अवघा परिसर दुमदुमून गेला होता.
आंदोलन पुण्यात येण्यापूर्वीच मेणाचा पुतळा, बच्चन-तेंडुलकरनंतर मनोज जरांगेंचा सन्मान
सहा प्रमुख राम मंदिरात मानाचे ताट :
याचबरोबर ‘ट्रस्ट’कडून तुळशीबाग राम मंदिर, रहाळकर राम मंदिर, पुणे विद्यार्थी गृह, काटे राम मंदिर, जोशी राम मंदिर आणि काळाराम मंदिर यांना मानाचे ताट देण्यात आले. सायंकाळी मंदिरात दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर, विवेक मटकरी, प्रशांत यादव आणि अॅड. शरद चंद्रचूड यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. ट्रस्टच्यावतीने अयोध्या रामजन्मभूमी सोहळा लाईव्ह पाहण्याची सोयही करण्यात आली होती.