मराठ्यांचं वादळ पुण्याकडे : अहमदनगरकडे जाणारी सर्व वाहतूक वळवली !
Maratha Reservation Mumbai Protest : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगेंबरोबर (Manoj Jarange) मराठ्यांचा जनसागर आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. हा जनसागर मंगळवारी पुणे शहरात दाखल होणार आहे. हा जनसागर पुणे-नगर महामार्गावरून जात आहे. मंगळवारी हा आरक्षण मोर्चा खराडी येथे मुक्कामी थांबणार आहे. तर दुसऱ्या दिवशी लोणावळा येथे मुक्कामी थांबणार आहे. त्यामुळे या मार्गावरील व आजूबाजूचे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान; गोविंदगिरी महाराजांनी वक्तव्ये मागे घ्यावीत, रोहित पवारांची मागणी
मंगळवारी (२३ जानेवारी) पहाटे तीन वाजल्यापासून आवश्यकतेप्रमाणे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात आली आहे.
१) मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून तसेच कोल्हापूर, सातारा येथून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशिन चौक मंतरवाडी फाटा हडपसर मार्गे सोलापूररोडने केडगांव चौफुला – नाव्हरे शिरुर मार्गे जातील.
२) वाघोली, लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून वाहतूक केडगांव चौफुला नाव्हरा मार्गे शिरुर ते अहमदनगर अशी वळविण्यात येईल.
३) पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेवून मगरपट्टा चौक – डावीकडे वळण घेवून सोलापूर रोडने यवत केडगाव चौफुला नाव्हरे शिरुर मार्गे जातील.
२४ जानेवारी रोजी मराठा आरक्षण मोर्चा पुणे शहरामधून जाणार आहे. त्यामुळे वाहतूक वळविण्यात आलेली आहे.
१) अहमदनगरकडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथून केसनंद थेऊर मार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील.
२) वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळवाडी मांजरी खुर्द मांजरी बुद्रुक केशवनगर – मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील
3) पुणे शहरामधुन अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी – धानोरी – लोहगांव वाघोली मार्गे अहमदनगरकडे अशी वळविण्यात येईल.
मराठा आरक्षण मोर्चा जसजसा पुढे मार्गस्थ होईल, त्याप्रमाणे मोर्चाचे मागील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी वर नमुद वाहतूक बदलांचा अवलंब करुन वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे.