सुप्रीम कोर्टातील नाहीतर हैदराबाद संस्थानातील आरक्षण द्या; मनोज जरांगेंनी सांगितला मराठ्यांचा इतिहास

सुप्रीम कोर्टातील नाहीतर हैदराबाद संस्थानातील आरक्षण द्या; मनोज जरांगेंनी सांगितला मराठ्यांचा इतिहास

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टीकत नाही असा काही तज्ञांकडून दावा केला जातो आहे. पण मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी वेगळी असल्याचं समोर आलं आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरेंचा आरक्षणबाबतचा संभ्रम आम्ही दूर केल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. जरांगे यांनी सांगितले की मराठवाड्यातील मराठा समाजाला निजमांच्या काळात आरक्षण मिळालं होतं. मराठवाडा महाराष्ट्रात आल्यानंतर हे आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.

Sunny Leone: सनी लिओनीने ऑटिस्टिक मुलांसोबत केलेला रॅम्प वॉक पाहिलात का?

जरांगे म्हणाले की आमची मागणी सुप्रीम कोर्टात नाहीतर मरावाड्यातील शेतकरी कुणबी या आरक्षणाची आहे. पूर्वी आम्हाला आरक्षण होतं त्यासाठी हा लढा आहे.

सुप्रीम कोर्टातील आरक्षणाची मागणी नाही
सुप्रीम कोर्टात गायकवाड आयोगानं मराठा आरक्षणाचा अहवाल सादर केला पण त्या आरक्षणाची आमची मागणी नाही. हे एसईबीसीचं आरक्षण रद्द झाल्यानं त्याची आमची मागणी नाही. मराठवाडा एक वर्षानंतर अखंड महाराष्ट्रात सहभागी झाला होता.

मराठा आरक्षणाचा आवाज बनलेले मनोज जरांगे कोण आहेत?

आम्ही हैदराबाद संस्थानात असताना मराठ्यांना आरक्षण होतं. पण पुढे आम्हाला ते आरक्षण लागू केलं नाही. हे आम्ही राज ठाकरेंना सांगितल्यानंतर त्यांच्या खरा विषय लक्षात आला, असंही ते यावेळी म्हणाले.

सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं
मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील मराठ्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. त्यामुळं राज्यातील सरसकट सर्व मराठ्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं, म्हणून आम्ही हा लढा उभा केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाची आमचा काहीही संबंध नाही. जालन्यातील काही तालुक्यात कुणबींचे जुने पुरावे सापडले आहेत, असे जरांगे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube