Manoj Jarange : गाडी नसेल तर एसटीचे तिकीट काढून देतो; एकदाही भेट न घेतल्याने जरांगेंचा अजित पवारांना टोला
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली आहे. त्या दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी एकदा भेट घ्यावी. सात महिन्यात अजित पवारांनी एकदाही भेट घेतलेली नाही. तुम्हाला गाडी नसेल तर आम्ही एसटी बसचे तिकीट काढून देतो. त्यावेळी आज 22 जानेवारीला जरांगे यांनी अहमदनगरमधून मुंबईकडे आपली फौज रवाना केली आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Sonali Bendre : ब्लॅक अॅण्ड व्हाईट ड्रेसमध्ये सोनाली बेंद्रे, ग्लॅमरस लुक्सवर चाहते फिदा!
आम्ही धीर धरला आहे. अजित पवारांनी एकदा भेट घ्यावी. सात महिन्यात अजित पवारांनी एकदाही भेट घेतलेली नाही. तुम्हाला गाडी नसेल तर आम्ही एसटी बसचे तिकीट काढून देतो. तसेच आम्ही सरकारला सात महिन्यांचा वेळ दिला आहे हा वेळ थोडा नाही उलट अजित पवार यांनी मराठ्यांच्या बाजूने सरकारशी बोललं पाहिजे. तसेच अजित पवार जर आरक्षण घेऊन आले. तर मी त्यांच्या गळ्यात उडी मारेल. तसेच अजित पवार हे जर आरक्षणाच्या विरोधात बोलणार असतील तर आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यांनी कारवाईची भाषा करू नये. अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाईचा आरोप करू. असा इशारा जरांगे यांनी दिला.
Ram Mandir : अयोध्येतील नव्या राजकीय मोदी रामायणाचा श्रीरामांशी संबंध नाही; ठाकरे गटाचा टोला
त्याचबरोबर यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर देखील जरांगे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, छगन भुजबळ हे जर मराठ्यांच्या कुणबी नोंदींना आव्हान देणार असतील तर आम्ही मंडळ आयोगालाच आव्हान देऊ. मात्र मला गोरगरीब ओबीसींचं नुकसान करायचं नाही. तसेच भुजबळांनी ओबीसींचीच अडचण केली. ओबीसी बांधवांना मराठ्यांविरुद्ध भडकवण्याचं काम भुजबळ यांनी केलं आहे. त्यामुळे खेड्यांमध्ये एकत्र राहणारा मराठा ओबीसी समाज एकमेकांच्या विरुद्ध जात आहे.
मराठा समाजाला ( Maratha Reservation) आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे. मनोज जरांगे व मराठा समाज मुंबईत 26 जानेवारीपासून आंदोलनाला बसणार आहे. त्यामुळे जरांगे हे मुंबईत येण्यापूर्वीच सरकारकडून आता उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात आज श्रीराम मंदीर प्राण प्रतिष्ठासोहळ्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.