Ram Mandir : अयोध्येतील नव्या राजकीय मोदी रामायणाचा श्रीरामांशी संबंध नाही; ठाकरे गटाचा टोला
Ram Mandir : अयोध्येत आज 22 जानेवारीला ( Ram Mandir) होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे या सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून (UBT) शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
Weather Update : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट, पुढील तीन दिवस पावसाची शक्यता
आजच्या सामनामध्ये म्हटले आहे की, आज भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्यातील मंदिरात होत आहे. जगभरातील हिंदूंसाठी हा भाग्याचा आणि गौरवाचा दिवस आहे. आयोध्या हे रामाचं राज्य पण आज त्याच्यावर भाजपच्या फौज्यांनी ताबा घेतला आहे. त्याला 2024 च्या निवडणुकांचे रणमैदान करण्यात आले. त्याचबरोबर या निमित्ताने भाजपच्या लोकांनी देशभरात अशी वातावरण निर्मिती केली आहे की, वाल्मिकी तुलसीदास, कबीर, कम्ब यांचे रामायण खरे नसून मोदी हेच नव्या रामायणाचे निर्माते आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने पूजाअर्चा व्रत अनुष्ठान उपवास करत आहेत. हे सर्व गंमतच आहे. या निमित्ताने अयोध्यामध्ये नवे ‘मोदी रामायण’ निर्माण झाले असून ते संपूर्ण राजकीय आहे. त्याचा प्रभू श्रीरामांच्या जीवनाशी चरित्राशी शौर्यशी काहीही संबंध नाही. अशी टीका सामनातून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर करण्यात आली आहे.
Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर; अयोध्येसह संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण
दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात राजकारणी, अभिनेते, खेळाडू आणि उद्योगपतींचा समावेश आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना देखील या निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला अयोध्येत जाणार नाहीत. तर त्या ऐवजी ते नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांची महाआरती करणार आहेत.
Horoscope Today : तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा दिवस खास! आजचे राशीभविष्य जाणून घ्या
आज होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा दुपारी वाजून 12 वाजून 20 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर हा सोहळा 40 मिनिटे चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.