‘आमंत्रण मिळालं, 22 जानेवारीनंतर रामाचं दर्शन घेणार’; आभार मानत शरद पवारांचं ट्रस्टला पत्र

‘आमंत्रण मिळालं, 22 जानेवारीनंतर रामाचं दर्शन घेणार’; आभार मानत शरद पवारांचं ट्रस्टला पत्र

Sharad Pawar on Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही महत्वाचे विधान केले आहे. श्रीराम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण मिळाले नसले तरी मी 22 जानेवारीनंतर अयोध्येला जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर आता श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून शरद पवार यांना आमंत्रण मिळाले आहे. शरद पवार यांनीच याबद्दल माहिती दिली आहे.

राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवार यांनी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे आभार मानले आहेत. अयोध्येला मी नक्की जाणार पण 22 जानेवारीनंतर जाणार. या दिवशी अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्त येणार आहेत त्यामुळे मी 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. माझे अयोध्येला येणे नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचे काम देखील पूर्ण झालेले असेल अशी अपेक्षा शरद पवार यांनी या पत्रात व्यक्त केली.

अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी! तब्बल 14 कोटी रुपयांना खरेदी केली ‘सेव्हन स्टार’ प्रॉपर्टी

याआधी राम मंदिराचा निर्णय राजीव गांधी (Rajiv Gandhi)यांच्या काळात झाला. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी उपस्थित केला होता. देशातल्या लोकांची उपासमार घालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दहा दिवस उपवास करावा, असा टोलाही यावेळी शरद पवार यांनी काल पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना लगावला होता.

आत्ताचं केंद्र सरकार लोकांच्या महत्वाच्या प्रश्नांना सोडून धार्मिक प्रश्नांवर मनं वळवण्याचा प्रयत्न करत आहे. अयोध्येच्या श्रीरामाचा आदर हे देशातील सर्व लोक करणार आहेत. देशातील प्रत्येकाच्या मनात श्रीरामाबद्दल आदराच्या भावना कोट्यवधी लोकांच्या मनात आहेत. पण आज लोकांचे प्रश्न बाजूला ठेवायचे हे योग्य नाही. मंदिर उभे करण्यासाठी कोणाचा विरोध नाही. खरं सांगायचं म्हणजे, बाबरी मस्जिद पाडल्यानंतर श्रीराम मंदिर बांधायचा जेव्हा विचार झाला, त्याची परवानगी राजीव गांधी पंतप्रधान असताना देण्यात आली. त्या मंदिराचा शिलान्यास हा राजीव गांधी पंतप्रधान असतानाच झाला असेही पवार म्हणाले होते.

देशातली उपासमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा; पवारांचा टोला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube