देशातली उपासमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा; पवारांचा टोला
Sharad Pawar On PM Modi : राम मंदिराचा निर्णय राजीव गांधी (rajiv gandhi)यांच्या काळात झाला. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी उपस्थित केला आहे. देशातल्या लोकांची उपासमार घालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी दहा दिवस उपवास करावा, असा टोलाही यावेळी शरद पवार यांनी लगावला आहे. पुणे (Belgaum)जिल्ह्यातील निपाणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा व नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा; काँग्रेस नेत्यांच्या सहभागी होण्यावर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले…
यावेळी शरद पवार म्हणाले की, आत्ताचं केंद्र सरकार लोकांच्या महत्वाच्या प्रश्नांना सोडून धार्मिक प्रश्नांवर मनं वळवण्याचा प्रयत्न करत आहे. अयोध्येच्या श्रीरामाचा आदर हे देशातील सर्व लोक करणार आहेत. देशातील प्रत्येकाच्या मनात श्रीरामाबद्दल आदराच्या भावना कोट्यवधी लोकांच्या मनात आहेत. पण आज लोकांचे प्रश्न बाजूला ठेवायचे हे योग्य नसल्याचे पवार म्हणाले.
सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर तोडगा, शिष्टमंडळ जरांगेंना नवा ड्राफ्ट देणार; बच्चू कडूंचे वक्तव्य
मंदिर उभा करण्यासाठी कोणाचा विरोध नाही. खरं सांगायचं म्हणजे, बाबरी मस्जिद पाडल्यानंतर श्रीराम मंदिर बांधायचा जेव्हा विचार झाला, त्याची परवानगी राजीव गांधी पंतप्रधान असताना देण्यात आली. त्या मंदिराचा शिलान्यास हा राजीव गांधी पंतप्रधान असतानाच झाला.
त्याच्या नंतरच्या काळात काही लोक कोर्टात गेले, त्यानंतर ती केस अनेक वर्ष चालली. आता त्याचा निकाल लागला आणि त्या जागेत कोर्टाने मंदिर बांधायला परवानगी दिली. त्यानंतर त्या मंदिराचं काम सुरु करण्याचा विचार समोर आला.
आता ही पार्श्वभूमी असताना आणि हे मंदिर व्हावं म्हणून देशातील कानाकोपऱ्यातील लोक आपापल्या परिने योगदान देण्याचं काम करतात, पण त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला अन् रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम भाजप आणि आरएसएसने सुरु केलं आहे. ही गोष्ट आपण गांभीर्यानं घेतली पाहिजे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.
आज धर्माच्या नावावर, समाजाच्या नावावर, समाजासमाजामध्ये अंतर कसं निर्माण करता येईल हा दृष्टीकोन राज्यकर्त्यांचा आहे. राज्यकर्ते उपाशी शेतकरी, कष्टकरी, मजूर त्याच्यासाठी प्रयत्न करत नसल्याचा आरोपही यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला.