प्रसिद्ध अभिनेत्री थेट प्रचाराच्या मैदानात; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा केला दारोदार प्रचार

सध्या एक प्रसिद्ध अभिनेत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 12T171348.877

सर्वच पक्ष मुंबईत पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. (BMC) सध्या एक प्रसिद्ध अभिनेत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक पक्ष पूर्ण ताकदीने प्रचार करतोय.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तर राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईच्या पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्षेत्रातील चर्चेतल्या आणि प्रसिद्ध चेहऱ्यांना प्रचारात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहेत.

मला धमकी देणारे ठाकरे कोण? मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही म्हणणाऱ्या अन्नामलाईंनी ठोकला शड्डू

सध्या मुंबईत एक बडी अभिनेत्री थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार मोहिमेत उतरली आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव रवीना टंडन असे आहे. सध्या सोशल मीडियावर रवीना टंडनचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रवीना टंडना शिवसेनेच्या ठाकरे गटाचा प्रचार करताना दिसत आहे.

रवीनाच्या गळ्यात ठाकरेंच्या पक्षाचे चिन्ह असलेला रुमाल दिसतो आहे. सोबतच रवीना ठाकरे यांच्या उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन करताना दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. काही व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. त्यामुळे आता ठाकरेंच्या प्रचाराल सिनेसृष्टीतील कलाकार उतरल्याने भविष्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us