BMC Election : मोठी बातमी! मुंबईत खळबळ; कारमध्ये सापडली तब्बल 16 लाखांची रोकड
BMC Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेसाठी आता जोरदार प्रचाराची सुरुवात झाली असून प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित
BMC Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेसाठी आता जोरदार प्रचाराची सुरुवात झाली असून प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात लागू असलेल्या आचारसंहितेच्या काळात 16 लाख 16 हजार रुपयांची रोख रक्कम एका कारमधून जप्त करण्यात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) राज्य निवडणूक आयोगाकडून 9 ठिकाणी 27 स्थिर संनिरीक्षण पथके कार्यरत करण्यात आली आहे. या संनिरीक्षण पथकाच्या कारवाई दरम्यान 9 जानेवारी रोजी दुपारी 12.35 ला वाशी येथील अरेंजा कॉर्नर परिसरात वाहन क्रमांक MH 43 BG 0002 याची तपासणी केली असता या कारमध्ये अंदाजे 16 लाख 16 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी मतदान होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन युतीची घोषणा केल्याने मुंबईतील अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदली असल्याने कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
14 लाख कोटी रुपये बुडाले! सेन्सेक्स 5 दिवसांत 2200 अंकांनी घसरला; कारण काय?
तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात असून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसह आघाडी केली आहे.
