मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंचा मास्टरप्लॅन! मोठा डाव टाकला, स्वत:चं उतरले मैदानात

Eknath Shinde starts work for Mumbai Municipal Corporation elections : मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी (Mumbai Municipal Corporation elections) शिंदे गटाची रणनिती आता प्रत्यक्ष अंमलात येऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) स्वतः मैदानात उतरून शिवसेना (शिंदे गट)च्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांतील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शासकीय यंत्रणांना अडचणी दूर करण्याचे स्पष्ट आदेश देत शिंदे यांनी निवडणुकीच्या (BMC Election) तयारीला वेग दिला आहे.
कुर्ला आणि चांदीवलीवर विशेष लक्ष
कुर्ला विधानसभा मतदारसंघातील आमदार मंगेश कुडाळकर यांच्या भागातील प्रलंबित कामांबाबत शिंदे यांनी थेट उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत स्थानिक प्रकल्प, विकासकामे, नागरी समस्या यावर चर्चा झाली (Maharashtra Politics) असून तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले.
पाटणकरांचा भाजप प्रवेश देसाईंच्या जिव्हारी; ‘भात्यात’ बाणांची जमवाजमव करत घेतले फडणवीसांचे नाव
त्याचप्रमाणे, चांदीवली मतदारसंघातील आमदार दिलीप लांडे यांच्या भागातील प्रलंबित कामांवरही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे या मतदारसंघातील कामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीचा मोठा डाव
मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिंदे गटाने ठोस हालचाली सुरू केल्या आहेत. ठाकरे गटाच्या तुलनेत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी विकासकामांचा झपाटा लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिंदेंच्या सेनेकडील मतदारसंघांमध्ये कामांची गती वाढल्याने, स्थानिक जनता खुश होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फायदा आगामी निवडणुकीत मिळेल, असा भाजप-शिंदे गटाचा विश्वास आहे.
रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल! आधार पडताळणीशिवाय… कधीपासून नियम लागू होणार?
मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे शिवसेना गटांमध्ये प्रतिष्ठेची लढाई! त्यामुळेच शिंदे गट काहीही करून सत्ता मिळवण्याच्या तयारीला लागलेला दिसतो. खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला हाताशी धरत विकासकामांच्या माध्यमातून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याची मोहीम सुरू केली आहे. या रणनितीमुळे ठाकरे गटासाठी आगामी लढत अधिक कठीण होण्याची शक्यता आहे.