भोसरीत मुख्यमंत्री फडणवीसांची सभा; स्वागतासाठी उडवलेल्या फटाक्यांमुळे इमारतीला भीषण आग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (246)

Fire breaks out in building due to firecrackers being set off :  राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून आज राज्यभरात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा आणि प्रचार दौरे सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या गोदावरी काठावर सभा घेतल्यानंतर पुण्यातील रोड शोसाठी दाखल झाले. दरम्यान, मुंबईत ठाकरे बंधूंची एकत्र जाहीर सभा होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबईकडे लागलेलं असतानाच, पुण्यात एक अनपेक्षित घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यातील भोसरी परिसरात मुख्यमंत्री फडणवीस यांचा रोड शो सुरू असताना एका इमारतीवर फटाके उडवले जात होते. याच दरम्यान फटाक्यांची ठिणगी लागून त्या इमारतीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संबंधित इमारतीवरील मोबाईल टॉवर पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

एमआयएमशिवाय नगरचा महापौर होणार नाही, असदुद्दीन ओवैसींचा थेट दावा

दरम्यान, या रोड शोदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांवर नाराजी व्यक्त केल्याचंही पाहायला मिळालं. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी नागरिकांना रोखण्यासाठी दोर लावले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हा दोऱ्यांचा वेढा काढण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याची माहिती आहे. एकीकडे राज्यभर प्रचाराचा धुरळा उडालेला असताना, पुण्यातील ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.

follow us