भाजप करतो ते अमरप्रेम; आम्ही करतो तो लव्ह जिहाद; उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत की नाही हा माझा पहिला प्रश्न आहे. जरा तपासून बघा ?
Uddhav Thackeray On BJP : मुंबई महानगरपालिका (BMC Election) निवडणुकीसाठी रविवारी शिवाजी पार्कवर उद्धव व राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. या सभेत शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत की नाही ?
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार. ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत की नाही हा माझा पहिला प्रश्न आहे. जरा तपासून बघा ? काय तपासून बघायचे ते ? डोकं, बर्थ सर्टिफिकेट वगैरे मी म्हणतोय. आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत. राज ठाकरे यांनी पोटभर जेवण दिलयं. एवढं पोट भरल्यानंतर, पोटतिडकीने त्याने सांगितल्यानंतर पोटाला तड लागून उपयोग नाही. डोक्यात तिडीक गेली पाहिजे. ती जाणार नसेल तर मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणण्याचा आम्हाला अधिकार नाही. जय भवानी, जय शिवाजी म्हणायचे आपल्याला अधिकार नाही. काय योगायोग आहे. आज आमच्या खांद्यावर धुरा आली आहे. आज सगळ्यांना कळलं असेल ठाकरे बंधू एकत्र आले का ? भावकी एकत्र झाली आहे. आता गावकीही एकत्र आली आहे.
लचके तोडणार असाल तर शेपूट घालून घरात बसावे का ?
ही सगळी लाचार माकड, हे कधी वाघ बनू शकत नाही. आता लक्षात आले असेल शिवसेना संपविण्या मागचा यांचा डाव काय होता ? मराठीची प्रेम रक्तात असावे लागते. आमच्या डोळ्या देखत आमच्या घराची, राज्याची, भाषाची लचके तोडत असेल तर आम्ही शेपूट घालून घरात बसवे का ? असं भाजपवाल्यांना वाटलं असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजप म्हणजे सर्वसमावेशक विकास; प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपकडून केवळ विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार
फडणवीस तुम्हाला एक लाख रुपये देतो; उद्धव ठाकरे
आम्ही मराठीसाठी एकत्र आलो आहोत. आमच्यामध्ये तसे वाद नव्हतेच. पण जे वाद होते, ते आम्ही गाडून टाकले आहोत. ही निवडणूक महापालिकेची आहे. भाजप काय प्रचार करतंय ? दर निवडणूक आल्यानंतर भाजपने हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी वाद सुरू केले आहेत. महापौर कोण होणार आहेत. देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आव्हान देतोय, तुमच्या मोदींपासून खालच्या चेल्याचपट्यांचे हिंदू व मुस्लिम न केलेले भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतोय. ते भांडत ठेवत आहे. मुळामध्ये हे लढणारे नाहीत. हे आगी लावणारी आहेत. आपलीच माणसे आपल्यावर सोडत आहे. जनसंघ कुठे नव्हता. तेव्हाही गुजरातचा डोळा मुंबईवर होता. तुम्ही हिंदू म्हणता तो मोरारजी देसाई नररक्षक गुजरातमध्ये जन्माला होता. तोच नररक्षक मुख्यमंत्री होता. त्यानेच दिसताच गोळा घालण्याचे आदेश दिले आहे. तेव्हा जनसंघ कुठेही नव्हता. पोळीला तुम्ही आणि गोळीला आम्ही. मेवाभाऊ तुम्हाला काय शिकविता हे सर्व अदानीकरण चालले आहे. मला आता भिती वाटत आहे. मुंबईचा पुन्हा बॉम्बे करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलाय.
नवी मुंबई महानगरपालिका: भाजपचे कॅप्टन चव्हाण व गणेश नाईकांनी शिंदेंना गॅसवर आणलयं ?
तुम्हाला मुंबईचा घास गिळता येणार नाही
भाजपबरोबर शिवसेनेने हिंदुत्वासाठी युती केली होती. शिवसेनाप्रमुख, जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार ही एकत्र आले होते. नितीशकुमार यांचे उदाहरण बघितल्यानंतर हिंदुत्ववादी शिवसेना का नको, याचे उत्तर का मिळाले आहे. संघ मुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार चालतात. जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत तुम्हाला मुंबईचा घास गिळता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला शिवसेना नको आहे. पक्ष संपविण्याचा विकृतपणे तुमच्यात आहे.
मी भाजपच्या ढोंगावरती लाथ मारतो
तुम्ही तर मोदींचे बॅंण्डवाले, आमचा ब्रँड संपविण्यासाठी निघाला आहात. आमचा पक्ष संपविण्यासाठी निघाले आहेत. शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत. म्हणून दोन नावे पुसून टाकायची. हे एकदा संपले की मराठी माणूस उभाच राहू शकत नाही. मराठी माणूस सहनशील आहे, दयावान आहे. कोण अंगावर आला, हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका आम्ही कुणाला घाबरण्यासाठी युती केलेली नाही. आम्ही कोणाचे हिसकावून घेण्यासाठी युती केलेली आहे. आहे. आमच्यात घरात येऊन दादागिरी करत आहे. त्यांच्याविरोधात आम्ही आवाज उठवायचे नाही का ? मी भाजपच्या ढोंगावरती मी लाथ मारतो आहे. भाजप करतो ते अमरप्रेम, आम्ही करतो तो लव्ह जिहाद. आम्ही अमर शेखची आठवण काढली, तर आम्ही हिंदूत्व सोडलं. काँग्रेसला हात मिळविणे केली तर हिंदुत्व सोडलं म्हणता. मला हिंदू-मुस्लिमचे राजकारणात करायचे नाही, असे ठाकरे म्हणाले.
