नवी मुंबई महानगरपालिका: भाजपचे कॅप्टन चव्हाण व गणेश नाईकांनी शिंदेंना गॅसवर आणलयं ?

Navi Mumbai Maha Palika Election: गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना शिंगावर घेतलंय. येथे भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठापणाला लागलीय.

  • Written By: Published:
Ravindra Chavan

Navi Mumbai Maha Palika Election-ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती झालीय. पण जवळच्या नवी मुंबईमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या रणनितीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना जेरीस आल्या सारखी परिस्थिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), त्यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कात्रीत सापडले आहेत. वनमंत्री गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना शिंगावर घेतलंय. त्यामुळे येथे भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठापणाला लागलीय.

नवी मुंबईत 28 प्रभागांतून 111 नगरसेवक निवडले जाणार आहेत. महायुतीत फूट असूनही भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना स्वतंत्र लढत आहेत, पण चव्हाण यांनी या लढतीला पक्षाच्या प्रतिष्ठेची आणि कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक ताकदीची परीक्षा बनवलीय. नवी मुंबई महापालिका निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजवर केलेल्या संघटनात्मक कामाची ताकद दाखवण्याची संधी चालून आलीय. स्वबळावर लढवली जाणारी ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेची आहे. आठ जानेवारीला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. 20 वर्षांसाठी पाणीपट्टी-घरपट्टी वाढणार नाही हे प्रमुख आश्वासन देण्यात आलाय. हरित ऊर्जा प्रकल्प, हवेची गुणवत्ता सुधारणा, पाणीपुरवठा मजबूत करणे हे मुद्दे मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करतायत. शिंदे गटाने नाईक कुटुंबावर कुटुंबवाद आणि भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. त्याला गणेश नाईकांनी त्याच तोडीस तोड उत्तर दिलंय. उन्माद कराल तर तो मोडण्याची माझ्याकडं ताकद आहे. एकनाथ शिंदे यांचा टांगा पटली आणि घोडे फरार करेल असा इशाराच गणेश नाईक यांनी दिलाय. तर एकनाथ शिंदे यांच्या आरोपांना चव्हाण यांनी विकास आणि ‘डबल इंजिन सरकार’च्या मुद्द्याने उत्तर दिले. नाईक यांच्या स्थानिक प्रभावाला केंद्रस्थानी ठेवून भाजपला मजबूत करण्यासाठी चव्हाणांनी डाव टाकलाय.

मागील वेळेस येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. परंतु यंदाच्या विधानसभेनंतर भाजप येथे मजबूत झालीय. चव्हाण यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे आणि नाईक यांच्या स्थानिक करिष्मामुळे भाजपला येथे बहुमताची आशा असून, तशी रणनिती भाजपची आहे. येथे भाजपची संघटनात्मक ताकद निर्णायक ठरू शकते.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रवींद्र चव्हाण यांचे नेतृत्व. स्वबळाची लढत, विकासाचे मुद्दे आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजप येथे मजबूत स्थितीत दिसतोय. ही निवडणूक फक्त नगरसेवक निवडत नाही, तर भाजपच्या संघटनात्मक सामर्थ्याची आणि प्रदेशाध्यक्षांच्या करिष्म्याचीही परीक्षा आहे. मतदार विकास आणि पारदर्शकतेला प्राधान्य देतील असा विश्वास भाजपाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांना आहे. चव्हाण यांची रणनिती आणि गणेश नाईकांच्या बेधडक आरोपांमुळे शिंदे पिता-पूत्र बॅकफूटला गेलेत, असे राजकीय विश्वेषकांचे मत आहे.

follow us