गद्दारांची मांदियाळी असताना…, डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांचा पाठिंबा अन् काँग्रेसची इमोशनल पोस्ट 

Congress On Delimitation Bill : केंद्र सरकार 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेत डिमिलिटेशन विधेयक आणणार आहे. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Congress On Delimitation Bill

Congress On Delimitation Bill : केंद्र सरकार 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेत डिमिलिटेशन विधेयक आणणार आहे. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकसंघ ठेवण्यासाठी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत आहोत अशी माहिती शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिली असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) सोशल मीडिया पोस्ट करत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCPSP) जोरदार हल्लाबोल करत शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने कसा त्याग केला याची आठवण करुन दिली आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये काँग्रेसने राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि शरद पवार यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी शरद पवार यांचा हात घट्ट पकडल्याचे दिसत आहे. या फोटोला काँग्रेसने गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी, शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता. असा कॅप्शन दिला आहे.

काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?शरद पवार साहेबांना वयाच्या 85 व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता… मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे 10 आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 36 मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे 16, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे 20 आमदार होते.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली. आणि आता काय? परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.

follow us