Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर; अयोध्येसह संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर; अयोध्येसह संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

Ram Mandir : अयोध्येत आज 22 जानेवारीला ( Ram Mandir) होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा (Pran Pratishta) ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून ठिकठीकाणी विवध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Horoscope Today : तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा दिवस खास! आजचे राशीभविष्य जाणून घ्या

देशासह राज्यातही अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. तर आज होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा दुपारी वाजून 12 वाजून 20 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर हा सोहळा 40 मिनिटे चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

गुजरातमध्ये रामाच्या मिरवणुकीवर दगडफेक, प्राणप्रतिष्ठेपूर्वी तणाव वाढला

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात राजकारणी, अभिनेते, खेळाडू आणि उद्योगपतींचा समावेश आहे. यासोबतच या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परदेशी पाहुणेही येत असून त्यासाठी 100 हून अधिक चार्टर विमाने अयोध्या आणि लखनऊमध्ये उतरणार आहेत. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासंदर्भात अयोध्येतही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

ह्रदयात राम अन् हाताला काम, हे हिंदुत्व; आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं पण…; ठाकरे गटाची BJP टीका

हे सर्व पाहुणे अयोध्येत सकाळपासूनच दाखल होत आहेत. तसेच अयोध्या नगरी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजली आहे. देशातील विविध भागातून लोककला सादर करणारे कलाकार अयोध्येत ठिकठिकाणी लोककला सादर करत आहेत. या कलांमधून ते संस्कृतीचं दर्शन आणि आलेल्या भाविक आणि पाहुण्यांचं स्वागत करत आहेत. त्यासाठी या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube