रोहित पवारांकडून ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट; अजित पवार गटाचे टीकास्त्र

  • Written By: Published:
रोहित पवारांकडून ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट; अजित पवार गटाचे टीकास्त्र

Rohit Pawar : बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार, रोहित पवार यांना आज (दि. 24 जानेवारी) ईडी (ED) कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. दरम्यान, सकाळपासूनच रोहित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावरून आता अजित पवार (Ajit Pawar) गटाने रोहित पवारांवर जोरदार टीका केली.

‘काहीही हरकत नाही’: मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करण्याची आंबेडकरांची ऑफर जरांगेंनी स्वीकारली 

आज माध्यमांशी बोलतांना अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितलं की, ईडीने रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. ते या चौकशीचा राजकीय इव्हेंट करू पाहत आहेत. एकीकडे ते म्हणतात की माझ्यावर ही चौकशी लावण्यामागे कोणाचा तरी हात आहे, केंद्रीय यंत्रणांवर कोणचा तरी दबाव आहे, असं त्यांना सूचित करायचं आहे. जर चौकशीसाठी जायचंच आहे तर कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्तीप्रदर्शन करण्याची गरज काय? रोहित पवारही या प्रकरणाचाही राजकीय इव्हेंट करू पाहता आहेत. असा इव्हेट करून कोणावर तरी खापर फोडायची गरज काय? असा सवाल उमेश पाटील यांना विचारला आहे.

INDIA Alliance : ‘ममतांशिवाय ‘इंडिया’ आघाडी शक्य नाही’; स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेस बॅकफूटवर! 

दरम्यान, या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय तपास यंत्रणेकडून विरोधकांना मुद्दाम ठरवून त्रास दिला जात आहे, ईडी, सीबीआयच्या माध्यमातून सुडीची कारवाई सुरू आहे. जाणीवपूर्वक विरोधकांना टार्गेट केलं जातंय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असंही त्यांनी केले.

काय प्रकरण आहे?

कन्नड सहकारी कारखाना दिवाळखोरीत निघालल्यावर शिखर बँकेने लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळी हा कारखाना बारामती अॅग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला. तर लिलाव प्रक्रियेत सहभागी कंपन्यांचे एकमेकांशी झालेले व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. या प्रक्रियेत बारामती अॅग्रो व्यतिरिक्त हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्यांनी लिलावात सहभाग घेतला. या लिलावासाठी हायटेक कंपनीने उभारलेली पाच कोटी रुपयांची सुरुवातीची रक्कम बारामती अ‍ॅग्रोने भरल्याचा आरोप आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज