रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीचे छापे, आव्हाड म्हणाले, ‘आपलेच घरभेदी सहकारी सामील’

रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीचे छापे, आव्हाड म्हणाले, ‘आपलेच घरभेदी सहकारी सामील’

Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीने आज छापेमारी केली. ईडीने मुंबईसह पुणे, बारामती या सहा ठिकाणी छापे टाकलेत. सकाळपासून बारामती अ‍ॅग्रोच्या सहा कार्यालयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात ही कारवाई केली. दरम्यान, या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हा (Jitendra Awhad) यांनी या कारवाईवर भाष्य केलं.

पवारांचा पॉवर गेम! CM शिंदेंना धक्का देत बाळ्या मामा म्हात्रेंची राष्ट्रवादीत एन्ट्री 

बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर ईडीने आज धाड टाकल्याचे वृत्त आहे. ही कंपनी आमदार रोहित पवार यांची कंपनी आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान हा छापा टाकला. तर गतवर्षी रोहित पवार यांना बारामती अ‍ॅग्रोतील कथित गैरव्यवहार प्रकरणी नोटीस मिळाली होती. आता ईडीने त्यांच्या कंपनीवर छापा टाकला. ईडीच्या छाप्यानंतर इतर कोणालाही कंपनीत प्रवेश दिला जात नाही. दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिलं की, रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो या कंपनीवर ईडीने धाड टाकल्याची बातमी सजमली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याची हे त्याचं फळ आहे. वाईट याचेच वाटतं की, यात आपलेच घरभेदी सहकारी सामील आहे. परंतु, मला विश्वास आहे की, रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल, असं आव्हाड यांनी लिहिलं.

NCP MLA Disqualification : मोठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं 

राष्ट्रवादीतून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवार यांचे काम उल्लेखनीय आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळंच त्यांच्यावर कारवाई केल्याचं बोलल्या जातं आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम यांच्या आहाराबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर रोहित पवारांनी X वर पोस्ट करून जितेंद्र आव्हाड यांना चांगलचं सुनावलं होतं. तर काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आव्हाड यांनी मी रोहित पवार यांना महत्व देत नाही, असं म्हटलं होतं. मात्र, आज रोहित पवार अडचणीत येताच, आमदार आव्हांनी रोहित पवारांची बाजू घेतली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज