NCP MLA Disqualification : मोठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं

NCP MLA Disqualification : मोठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं

NCP MLA Disqulification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अद्याप निर्णय आलेला (NCP MLA Disqualification Case) नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी निश्चित झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून 20 आणि 21 जानेवारी रोज अजित पवार गटाची उलटतपासणी होणार आहे. त्यानंतर 22 आणि 23 जानेवारी रोजी शरद पवार गटाची उलटतपासणी सुरू आहे. 16 दिवस साक्ष आणि उलटतपासणी झाल्यानंतर अंतिम निकाल येणार आहे.

MLA Disqualification प्रकरणी मोठी अपडेट; वेळापत्रक पुन्हा बदलले, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

असे आहे वेळापत्रक 

  • 6 जानेवारी रोजी दोन्ही गटांत याचिका आणि उत्तराची कागदपभत्रे एकमेकांना दिली जातील.
  • 8 जानेवारी रोजी याचिकेसाठी अधिकची माहिती जोडण्यात येईल.
  • 9 जानेवारी रोजी या प्रकरणातील कागदपत्रे पटलावर आणण्यात येतील. मात्र यानंतर कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाहीत.
  • 11 जानेवारी रोजी या याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी करण्यात येईल. पहिल्या दिवशी शरद पवार गट त्यानंतर अजित पवार गटाने सादर केलेली कागदपत्रे तपासली जातील.
  • 12 जानेवारी रोजी याचिकेशी संबंधित कागदपत्र पडताळणीचा दुसरा दिवस असेल. यावेळीही आदल्या दिवशीप्रमाणेच कामकाज होईल.
  • 14 जानेवारी रोजी सुनावणीच्या कामकाजात काही कागजपत्रे दाखल करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी अर्ज करता येईल.
  • 16 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणीस सुरुवात.
  • 18 जानेवारी रोजी प्रतिज्ञापत्र सादर करता येईल.
  • 20 जानेवारी रोजी अजित पवार गटाच्या साक्षीदारांची उलटतपासणी होईल. 21 जानेवारीलाही ही उलटतपासणी सुरू राहिल.
  • 22 आणि 23 जानेवारी रोजी शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलटतपासणी होईल.
  • 25 आणि 27 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद होतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज