पवारांचा पॉवर गेम! CM शिंदेंना धक्का देत बाळ्या मामा म्हात्रेंची राष्ट्रवादीत एन्ट्री

पवारांचा पॉवर गेम! CM शिंदेंना धक्का देत बाळ्या मामा म्हात्रेंची राष्ट्रवादीत एन्ट्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  ठाणे-भिवंडी परिसरातील दिगग्ज नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी (Suresh Balya Mama Mhatre)राजकारणातील सर्वपक्षीय वर्तुळ पूर्ण केलं आहे. अनेक पक्ष फिरून आल्यानंतर ते आता राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झाले आहेत. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. बाळा मामा हे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, गोडाउन स्टोअरचे मोठे व्यवसायिक आहेत. त्यापेक्षा ते दबंग नेते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. एकेकाळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अत्यंत विशासू सहकारी म्हणून ते परिचित होते.

भाजप-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना अशा सर्वच पक्षांच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांसोबत बाळा मामांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कालांतराने राजकारणात येण्याची त्यांची इच्छा लपून राहिली नाही. शिंदे यांच्या कारकिर्दीत त्यांची शिवसेनेत डाळ शिजली नाही. तरीदेखील त्यांचे प्रयत्न सुरुच होते. सुरेश म्हा

बाळा मामांनी सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दाखल होत राजकीय कारकिर्दिचा श्रीगणेशा केला. पण ते मनसेमध्ये फार काळ रमले नाहीत. थोड्याच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. जिल्हा परिषद निवडणूक लढले. सभापती झाले. त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी २०१९ प्रयत्न सुरु केले होते. पण भिवंडी ही काँग्रेसकडे असल्याने ही जागा त्यांना मिळू शकली नाही. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले आणि पराभूत झाले. यानंतर अपक्ष राहून त्यांनी काम सुरु केले. यानंतर भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न झाला पण मंत्री कपिल पाटील हे भिवंडीचे खासदार असल्याने ती संधी देखील मिळाली नाही.

NCP MLA Disqualification : मोठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बाळ्या मामा यांचा प्रवेश ठरला. प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी नाना पटोले हे भिवंडीत गेले. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बाळ्या मामांसोबत चर्चा केली. जयंत पाटील यांनी थेट बाळा मामा यांना बोलावून घेतले. तिकडे काँग्रेस प्रवेशाचा ठरलेला कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर बाळा मामा शिवसेनेत जाण्यासाठी निघाले . उद्धव ठाकरे यांच्या पक्षात ते प्रवेशासाठी इच्छुक होते. पण महायुती सरकारच्या काळात पोलिसांत विविध गुन्हे दाखल झाले. हे सर्व गुन्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कपिल पाटील यांच्या आदेशाने झाल्याचे बाळ्या मामांच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता .

आता शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बाळा मामा यांचा प्रवेश झाला. जयंत पाटील यांनी त्यांना पक्षात आणले. भिवंडी हा मतदारसंघ जागावाटपात महाआघाडीत काँग्रसकडे राहिला आहे. १९९९ ते २०१४ सलग तीन वेळा काँग्रेसचे सुरेश टवारे या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले. २०१४ मध्ये मोदी लाटेत हा मतदारसंघ भाजपकडे गेला. कपिल पाटील निवडून आले. शिंदेंना शह देणारा नेता म्हणून भाजपने ही पाटील यांना बळ दिले. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत राहणार आहे. महाआघाडीत ही जागा काँग्रस सोडेल ही सुतराम शक्यता नाही. त्यामुळे बाळा मामांचा प्रवेश नक्की कशासाठी हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

Mla Disqualification : मॅरेथॉन सुनावणी संपली! शिंदे-ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण, निर्णयाची प्रतिक्षा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज