राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांदरम्यान आढळराव-मोहितेंचं मनोमिलन; शिरूरमध्ये आढळरावांचा मार्ग मोकळा?

राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांदरम्यान आढळराव-मोहितेंचं मनोमिलन; शिरूरमध्ये आढळरावांचा मार्ग मोकळा?

Shivajirao Adhalrao Patil : माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalrao Patil ) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र यावर राष्टवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील नाराज असल्याचं सांगण्यात येत होत. या चर्चांदरम्यान आता आढळरावांनी त्यांचे कट्टर विरोधक आणि राष्टवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील ( Dilip Mohite Patil ) ह्यांच्या निवासस्थानी सदिच्छ भेट देऊन मनमोकळा संवाद साधला. त्यामुळे आता आढळराव राष्ट्रवादीत जाण्याचा मार्ग सुकर झाला का? तसेच त्यांची शिरूरमधील उमेदवारी देखील निश्चित झाली का? या चर्चांना उधान आले आहे.

चेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिजकोवाने जिंकला 71st Miss World चा किताब; भारताच्या सिनी शेट्टीचं स्वप्नभंग

राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांदरम्यान आढळराव-मोहितेंचं मनोमिलन?

शिरुरमध्ये शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा आढळराव पाटील हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत गेल्यानंतर शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अमोल कोल्हे यांनाही पराभूत करणार असल्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यामुळे राजकीय सोय म्हणून आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करतील आणि शिरूर लोकसभा लढवतील, असे बोलले जात आहे.

Kasba Peth dargah चं बांधकाम अनधिकृतच, कबुली देत दर्गाहच्या ट्रस्टचा मोठा निर्णय!

मात्र त्यांच्या या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून मोहिते पाटील यांची नाराजी दिसून आली होती. मात्र त्यानंतर आता आढळराव यांनी मोहिते यांच्या निवासस्थानी जात त्यांची सदिच्छा भेट घेतली त्यामुळे भेटीनंतर मोहिते आणि आढळरावांमध्ये मनोमिलन झाल्याने आढळराव यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच या भेटीमुळे आढळरावंची शिरूर मधील उमेदवारी देखील निश्चित झाल्याचे बोलले जाते.

आढळराव-मोहितेंचं कायम कट्टर वैर…

आढळराव यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून यांचे कट्टर विरोधक असणारे राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी दिसून आली होती. त्यावर बोलताना मोहिते म्हणाले होते की गेली वीस वर्षे त्यांच्याबरोबर राजकीय संघर्ष केला. त्यामुळे ते जर आता राष्ट्रवादीत येणार असतील तर असे चुकीचं राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेल. असं म्हणत मोहिते यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. याच नाराजीमुळे काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मंचरमध्ये पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये दिलीप मोहिते पाटील गैरहजर असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र त्यावर आपण कुटुंबातील लग्नात व्यस्त असल्याने सभेला आलो नसल्याचं स्पष्टीकरण मोहिते यांनी दिला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube