Kasba Peth dargah चं बांधकाम अनधिकृतच, कबुली देत दर्गाहच्या ट्रस्टचा मोठा निर्णय!
Kasba Peth dargah : पुण्यातील कसबा पेठ ( Kasba Peth dargah ) येथील सलाउद्दीन दर्गा परिसरात अतिक्रमण हटवण्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर दर्गाच्या बांधकामाबाबत दर्गाच्या ट्रस्टने येथील बांधकाम अनधिकृत असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यात दर्गाच्या ट्रस्ट कडून स्वतःच अतिक्रमण हटवण्यात येणार आहे.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत या दर्ग्याच्या ट्रस्टची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
शुक्रवारी रात्रीच या दर्गाच्या अतिक्रमणावर कारवाई होण्याची शक्यता होती. त्यासाठी दर्गा बाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. तर पोलीस बंदोबस्त वाढवताच मुस्लिम समाज देखील मोठ्या संख्येने या परिसरात दाखल झाला होता. तब्बल 2000 हून अधिक मुस्लिम बांधव या परिसरात दाखल झाले होते. त्यामुळे काही अंशी या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
तर सोशल मीडियावर दर्गा हटवण्याची चुकीची अफवा पसरवल्याने दर्गा परिसरात हजारोच्या संख्येने नागरिक दाखल झाले. चुकीच्या पद्धतीने पसरलेली ही आफवा होती परंतु कोणता ही विवाद न व्हावा यासाठी दर्गा परिसरात पोलीसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला. तसेच दंगल नियंत्रण पथक देखिल परिसरात तैनात करण्यात आले.
नंतर ही अफवा आहे. हे लोकांनां सांगण्यात आले व दर्गा ट्रस्ट यांनी हे अतिक्रमण आम्ही काढू पोलिस किंवा पालिका कर्मचारी यांनी कारवाई करू नये. परिसरातुन जेसीबी हटवा आम्हीं अतिक्रमण काडून देतो ट्रस्टकडून असे सांगितले. ही अफवा समजल्या नंतर ही नागरिक परिसर सोडण्याठी तायार नव्हते.