Kasba Peth Bypoll : ठाकरे गटाचे टेन्शन वाढणार… माजी नगरसेवक नाराज?

Kasba Peth Bypoll : ठाकरे गटाचे टेन्शन वाढणार… माजी नगरसेवक नाराज?

पुणे : कसबा पेठ मतदार संघ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) महाविकास आघाडी (MVA) ही जागा काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आली आहे. काँग्रासचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena Thakeray Group) ठाकरे गट नाराज झाला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे (Vishal Dhanawade) हे कसबा पेठ मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते. या मतदार संघात काँग्रेसला उमेदवारी दिल्याने ठाकरे गटाचे विशाल धनवडे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे इच्छुक होते. गेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजप-शिवसेना युतीमध्ये बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. यावेळीही पोटनिवडणूक लढविण्यास ते इच्छुक होते. पक्षाचे संपर्क प्रमुख सचिन आहिर यांच्याकडेही त्यांनी तशी आग्रही मागणी केली होती. मात्र, शिवसेनेला कसबा विधानसभा मतदारसंघ न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत.

मतदारसंघाचे क्षेत्ररक्षक असलेल्या विशाल धनवडे यांचे शहर पदाधिकाऱ्यांबरोबर वाद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ते क्षेत्ररक्षक पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच मेसेजही समाजमाध्यमातून प्रसारीत झाले आहेत. मी राजीनामा देतो, एक शिवसैनिक म्हणून काम करत राहीन, अशा आशयाचे हे मेसेज आहेत. मात्र, विशाल धनवडे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

पुण्यात पोटनिवडणुकीवरुन सर्वच पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटालाही नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून कसबा पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube