Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil: अमोल कोल्हे यांची आढळरावांचे छंद काढण्याची धमकी

  • Written By: Published:
Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil: अमोल कोल्हे यांची आढळरावांचे छंद काढण्याची धमकी

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patill:  शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)  यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे खासदारअमोल कोल्हे यांच्यावर अभिनयाच्या छंदावरून वयक्तिक टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. मी माझे छंद उजळमाथ्याने सांगू शकतो, तशी आपल्या छंदाची परिस्थिती आहे का, असे म्हणत अमोल कोल्हेनी आढळरावांचे छंद काढण्याची धमकी दिली. मी कधी वयक्तिक टीकेला उत्तर देत नाही. परंतु जेव्हा सातत्याने गैरसमज निर्माण व्हावा या हेतूने पातळी सोडून वयक्तिक टीका केली जाते तेव्हा त्याला उत्तर देणे गरजेचे असते. असे अमोल कोल्हे म्हणाले. (Amol Kolhe’s criticism ofShivajirao Adhalrao Patil)

माजी खासदार आढळराव पाटील यांनी वैयक्तिक टीका केल्याने कोल्हे यांनी आपला संताप व्यक्त केला. कोल्हे म्हणाले, “तुम्ही माझ्या अभिनयाची कुचेष्टा केली. अभिनय माझ्या चरितार्थाचे साधन आहे. अभिनय माझा छंद आहे. मी माझे छंद चार माणसांत उजळमाथ्याने सांगू शकतो. तशी आपल्या छंदाची परिस्थिती आहे का, असा अडचणीचा प्रश्न विचारून आपल्यासारख्या वयस्कर माणसाची गोची करू इच्छीत नाही.” असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धमकी दिली.

नीलम गोऱ्हेंच्या एन्ट्रीने तानाजी सावंतांची खुर्ची धोक्यात: आरोग्य मंत्रिपदावरुन उचलबांगडी होणार?

तुमच्यात आणि माझ्यात मूलभूत फरक आहे तो म्हणजे, “शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला २००४, २००९, २०१४, २०१९ असे चारवेळा लोकसभेचे तिकिट दिले. त्यामुळे तुम्ही खासदार झाला. तुम्ही मात्र आपल्या स्वार्थासाठी ठाकरे यांच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून गेलात. दरम्यान, शरद पवार यांनी मला फक्त २०१९ मध्ये एकदाच लोकसभेचे तिकिट दिले.आज त्यांच्या अडचणीच्या काळात मी त्यांच्यासोबत उभा आहे. हा आपल्या दोघांतील फरक आहे.” असे अमोल कोल्हे म्हणाले.

आढळराव पाटील म्हणाल होते ?

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली होती. आढळराव म्हणाले होते, “डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेची सरळसरळ फसवणूक केली. शिरूरमधील जनतेशी त्यांनी प्रतारणा केलेली आहे. एका गावात मी काम केले असे त्यांनी ठामपणे सांगावे. बोलताना ते अभिनयाच्या जोरावर नाटकी आवाजात सांगतात मी दिलेले शब्द पूर्ण केले, मात्र तसे काहीही झालेले नाही. तसे त्यांनी एकही काम दाखवावे. त्यांनी मालिका, सिनेमे, नाटके खूप केली. मात्र मतदारसंघात त्यांनी गेल्या चार वर्षांत काय काम केले, असा प्रश्न मी मतदारसंघातील एक सामान्य नागरिक म्हणून विचारत आहे.”

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज