Masterchef India 2: ज्यूसचे दुकान चालवणारा मोहम्मद आशिक ठरला विजेता, जिंकले लाखो रुपये

Masterchef India 2: ज्यूसचे दुकान चालवणारा मोहम्मद आशिक ठरला विजेता, जिंकले लाखो रुपये

Masterchef India 2: मंगळुरू येथे राहणारा 24 वर्षीय मोहम्मद आशिक (Mohammad Aashiq) याने ‘मास्टरशेफ इंडिया 2’ (Masterchef India 2 Winner) ची ट्रॉफी जिंकला आहे. (Masterchef India 8)मास्टरशेफची शेवटची स्पर्धा 8 डिसेंबर रोजी सोनी लिव्हवर स्ट्रीम झालेल्या ग्रँड फिनालेमधील 4 फायनलिस्टमध्ये झाली. होम शेफ फायनलिस्ट रुखसार सईद, मोहम्मद आशिक, नंबी जेसिका आणि सूरज थापा यांना त्यांची डिश तयार करण्याचे आव्हान दिले होते. प्रत्येकाला त्यांच्या आवडत्या डिश तयार करण्यासाठी 90 मिनिटे देण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony LIV (@sonylivindia)


सर्वप्रथम सूरज थापाने आपली डिश सादर केली. सुरजने इंग्लिश ब्रेकफास्टची डेझर्ट डिश तयार केली होती. तिन्ही स्पर्धकांनी त्याचे सादरीकरण आणि डिश पाहून खूप प्रभावित झाले. शोच्या जजपैकी एक असलेल्या रणवीर ब्रारने विजेत्या मोहम्मद आशिकचे X अकाउंटवर एक फोटो शेअर करून त्याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले, “प्रेरणादायक सुरुवातीपासून ते आव्हानात्मक प्रवासापर्यंत, तुम्ही कधीही अधिक धाडस सोडले नाही. मास्टरशेफ मोहम्मद झाल्याबद्दल अभिनंदन!”

कर्नाटकातील मंगलोर येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद आशिकने शो जिंकल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून आनंद व्यक्त केला आहे. ज्यामध्ये तो म्हणाला आहे की, “मास्टरशेफ इंडियावरील माझ्या प्रवासाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. एलिमिनेशनला सामोरे जाण्यापासून ते ट्रॉफी मिळवण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण खूप मोठा धडा होता. या अनुभवाने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे आणि हे विजेतेपद जिंकणे अविश्वसनीय आहे.”

Box Office: ‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; चित्रपटाने आठव्या दिवशीही जमवला मोठा गल्ला

मोहम्मद आशिक याआधीही मास्टर शेफचा भाग राहिला आहे. त्याच्या प्रवासाविषयी बोलताना म्हणाला की, “गेल्या सीझनमध्ये कमी फरकाने मुकल्यानंतर काही निश्चयाने पुन्हा आगमन करणे कठीण होते, पण मी स्वयंपाकाच्या कलेसाठी स्वत:ला पूर्णपणे समर्पित केले. हा विजय फक्त माझा नाही; आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संकटांचा सामना करणाऱ्या प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्याचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली आहे.

पुढे म्हणाला की, शोचे जज- शेफ विकास, रणवीर आणि पूजा, सह-स्पर्धक, प्रेक्षक आणि सर्व शेफ यांचा अत्यंत आभारी आहे. ज्यांनी मला प्रत्येक दिवसाबरोबर स्वयंपाकघरात अधिक चांगले प्रदर्शन करण्यास प्रेरित केले. मी खूप वाढलो आहे आणि माझ्या स्वयंपाकाच्या कौशल्यात मोठे बदल पाहिले आहेत. “हे सर्व बूट कॅम्प अनुभवासाठी धन्यवाद आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube