भाजपमध्ये जाताच राहुल कलाटेंचा राजकीय धडाका; वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी व संवाद

Rahul Kalate: जनसंवाद कार्यक्रम आणि विकासकामांचा आढावा घेत भाजपची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवण्याची रणनीती कलाटे यांनी आखली आहे.

  • Written By: Published:
Rahul Kalate Bjp Leader

Rahul Kalate : पिंपरी चिंचवडचे स्थानिक नेते राहुल कलाटे हे भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत भेठीगाठी सुरू केल्यात. स्थानिक नेतृत्व, आमदार, मंत्री यांच्या भेटी राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी घेतल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राहुल कलाटे यांची भूमिका महत्वाची आहे. त्या दृष्टीने ते तयारी करत आहे. (rahul-kalate-bjp-pimpri-chinchwad-Meeting and dialogue with senior leaders)

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची त्यांनी गेल्या दोन दिवसांत भेटी घेतल्यात. या भेटींमुळे पक्षांतर्गत समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट होतंय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, माजी महापौर मिनाक्षी शिंदेंनी दिला राजीनामा

या सर्व बैठकींमध्ये आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका, संघटनात्मक मजबुती, बूथस्तरावरील कार्यकर्त्यांची बांधणी, स्थानिक प्रश्न, नागरी सुविधांचा विकास आणि भाजपची निवडणूक रणनिती यावर सविस्तर चर्चा झालीय. विशेषतः शहरात भाजपचा जनाधार अधिक व्यापक करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि प्रत्येक प्रभागात भाजप हा संदेश पोहोचवण्यावर भर देण्यात आला. या भेटींमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये शतप्रतिशत भाजप हे लक्ष्य गाठण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे समजते. आगामी काळात शहरभर दौरे, कार्यकर्ता मेळावे, जनसंवाद कार्यक्रम आणि विकासकामांचा आढावा घेत भाजपची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवण्याची रणनीती कलाटे यांनी आखली आहे.

Video : पांडे, वाघ अन् दिनकरांचं भाजपात जंगी वेलकम; विरोध करणाऱ्या फरांदेंचे डोळे पाणावले

समर्थकांमध्ये जोरदार उत्साह

राहुल कलाटे हे आता राजकारणात आक्रमक पावले टाकत आहे. त्यामुळे त्यांचा समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे.

follow us