राहुल कलाटेंच्या प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे बळ वाढले; शतप्रतिशतकडे वाटचाल
Rahul Kalate यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी कलाटेंसह प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि आमदार जगताप यांनी मनोगत व्यक्त केलं.
Rahul Kalate’s entry increases BJP’s strength in Pimpri-Chinchwad; Moving towards 100% : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराच्या राजकारणात आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. कारण शहरातील प्रभावी नेतृत्व, माजी नगरसेवक व महापालिकेतील माजी गटनेते राहुल तानाजी कलाटे (Rahul Kalate) भारतीय जनता पक्षात (BJP’) जाहीर प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश मुंबई येथे पार पडला आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि आमदार शंकर जगताप यांनी कलाटेंना विश्वास देत उपस्थितांना संबोधित केलं.
काय म्हणाले रविंद्र चव्हाण?
कलाटेंचा भाजप प्रवेश पार पडल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कलाटेंना (Rahul Kalate) विश्वास देत उपस्थितांना संबोधित केलं. ते म्हणाले की, राहुल कलाटेंच्या प्रवेशासाठी अनेक दिवसांपासून मुहूर्त पाहत होतो. त्यांना मी एवढंच अश्वासित करतो की, तुम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांवर विश्वास ठेवून भाजप प्रवेश केलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
काय म्हणाले शंकर जगताप?
कलाटेंचा (Rahul Kalate) हा पक्षप्रवेश भाजपच्या पिंपरी चिंचवडमधील आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. त्यावेळी त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले की, राहुल कलाटे या तरुण नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने आनंद झाला. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमध्ये रविंद्र चव्हाणांच्या नाऱ्याप्रमाणे अब की बार सौ नाही तर सव्वाशे पार होणार.
काय म्हणाले राहुल कलाटे?
पक्ष प्रवेशानंतर राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, कणखर व विकासाभिमुख नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योगदान देता येईल, या विश्वासातूनच हा निर्णय घेतला आहे. लोकांची कामे व्हायला पाहिजेत हीच माझी भूमिका राहिलेली असून, यासाठी मागील २० वर्षांपासून मी संघर्ष करतोय. लोकांनी कायमच माझ्यावर विश्वास ठेवला आहे. आणि हाच विश्वास मी भाजपा नेतृत्वाकडे सोपवत आहे.”
Pune Election : पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का…पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले भाजपात डेरेदाखल…
पुढे बोलताना कलाटे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या कष्टातून उभारलेल्या या शहराला देश-विदेशात ओळख मिळवून दिली आहे. मात्र, शहरात काही स्थानिक समस्या अद्यापही प्रलंबित आहेत. या सर्व समस्या सोडवून प्रत्येक नागरिकाला त्याचा न्याय्य हक्क मिळवून देणे आणि सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हेच माझे प्रमुख ध्येय आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी काम करत राहणार!”
राहुल गांधींच्या डोकेदुखीत भर घालणारे नवीन वर्ष! 2026 मध्ये सोडवाव्या लागणार 11 समस्या
या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. राहुल कलाटे यांचा प्रशासकीय अनुभव, व्यापक जनाधार, संघटन कौशल्य आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची कार्यपद्धती यामुळे भाजपाला निश्चितच बळ मिळणार आहे. या प्रवेशामुळे भाजपा शत प्रतिशत कडे वाटचाल करेल असे बोलले जात आहे.
छोट्या पडद्यावरील आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार
शहरातील विरोधी गटातील सर्वात मोठा प्रमुख नेता व आक्रमक चेहरा भाजपामध्ये दाखल झाल्याने भाजपासाठी स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये निर्णायक व सकारात्मक बदल घडणार असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी हा प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, अशी चर्चा शहरभर सुरू आहे.
