Chinchwad Assembly constituency : परिवर्तन घडणारच, थेरगावकरांचा निर्धार ; राहुलदादांना करणार आमदार !

  • Written By: Published:
Chinchwad Assembly constituency : परिवर्तन घडणारच, थेरगावकरांचा निर्धार ; राहुलदादांना करणार आमदार !

Chinchwad Assembly Constituency: चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे (Chinchwad Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस राहिले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांच्या भेटीगाठी राहुल कलाटे यांच्याकडून सुरू आहे. मतदार राहुल कलाटे यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्याचा प्रत्येय थेरगावातील परिवर्तन पदयात्रेत आला. या पदयात्रेत अबाल वृद्ध नागरिक महिला आणी युवकांनी जोरदार गर्दी केली होती. थेरगाव परिसरात कलाटे यांचे आगमन होताच हलगी तुतारीच्या कडाडणाऱ्या आवाजात, फटाक्यांची आतिषबाजी अन जागोजागी फुलांची पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले.

चिंचवडमध्ये 20 वर्षानंतर शरद पवार यांचा रोड शो, राहुल कलाटेंसाठी प्रचारात

यंदा आमचं ठरलंय- वार फिरलंय, परिवर्तन घडणारच, राहुलदादा आमदार होणारच या घोषणांनी थेरगाव परिसर अक्षरशः दुमदमला.
राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ थेरगाव गणेशनगरमधील गणपती मंदिर, परिसरातील सर्व कॉलनी, पडवळनगर, गुजरनगर, सोळा नंबर परिसर, अशोका सोसायटी, कैलास मंगल कार्यालय, धनगरबाबा मंदिर, तापकीर चौक, बारणे चौक, पदमजी पेपर मिल, दत्तनगर पूर्ण परिसरात परिवर्तन पद यात्रा काढण्यात आली.

Chinchwad By Election : राहुल कलाटे कुणाचं आव्हान मानतात अश्विनी जगताप की नाना काटे?

यावेळी अनेक वर्ष या परिसरात प्रलंबित असलेल्या समस्यांचे गाऱ्हाणे नागरिकांनी मांडले. थेरगावकर जनतेला आता बदल हवा असून, यंदा विकासाचा नवा आश्वासक चेहरा आम्हाला हवा असल्याने यावेळेस थेरगावकर राहुल कलाटे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणार अशी ग्वाही दिली.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक संपत पवार, मनोहर पवार, विशाल बारणे, विशाल पवार, संभाजी बारणे, शरद गुजर, नितीन पाडाळे, निखील गुजर, अमित गुजर, गणेश गुजर, दीपक तरडे, महेश बारणे, विनय बारणे, शरद बारणे, बबलू चांदणे, सुरेश गुजर, प्रकाश गुजर, विठ्ठल गुजर, दत्ता पोटे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदारसंघात कुठे विकास दिसतोय ?
सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर परिसर सोडला तर चिंचवड मतदार संघामध्ये कुठेही विकास दिसत नाही. म्हणूनच यंदा बदल हवा असल्याने अभ्यासू, उच्चशिक्षित अन विकासाची दूरदृष्टी असणारे राहुल कलाटे यांना विजयी मताधिक्य देण्याचा आम्ही थेरगावकरांनी संकल्प केला असल्याचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संपत पवार यांनी म्हटले आहे.


प्रस्थापिंतांनी अनेक वर्ष नागरिकांना वेड्यात काढले

थेरगावात प्राधिकरणाकडून महापालिकेकडे हस्तांतरित झालेली तसेच, सर्व सामन्यांची अनाधिकृत हजारो घरे आहेत. हाच जिव्हाळ्याचा मुद्दा घेऊन प्रस्थापितांनी अनेक वर्षे नागरिकांना वेड्यात काढण्याचे काम केले आहे. सत्ता असून देखील हा प्रश्न मात्र अद्याप त्यांना सोडवता आला नाही. त्यामुळे थेरगावकरांनी आशीर्वाद दिल्यास, येथील प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे राहुल कलाटे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube