राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडची निवडणूक विकासावर नाही तर भावनेवर…

राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडची निवडणूक विकासावर नाही तर भावनेवर…

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) भाजपचीच (BJP) सरशी झालीय. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळवलाय. भाजपच्या या विजयावर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate)यांनी आपली प्रतिक्रीया दिलीय. ते म्हणाले की, मला असं वाटलं होतं की हे इलेक्शन विकासावर होईल पण ते कुठेतरी भावनेवर आणि प्रतिष्ठेची केली गेली असं दिसून आलं. दोन्ही बाजूला मोठ्या पक्षांच्या ताकती आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जो मतदारांच्या जीवावर इलेक्शनला सामोरं जात होतो असं मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की मतदार माझ्याबरोबर आहेत. असं असताना मला असं वाटलं होतं की चेहरा आणि विकास याच्यावर इलेक्शन राहिल पण तसं एकंदर मतदानानंतर दिसत नाही.

भाजपनं राहुल कलाटेंना उभं केल्याच्या आरोंपावर कलाटे म्हणाले की, मी याच्याआधीही सांगितलं होतं की, महाविकास आघाडीकडं सक्षम पर्याय म्हणून मीच होतो आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा कदाचित उमेदवार मीच असतो तर कसब्यात धंगेकरांसारखा हादेखील महाविकास आघाडीचा विजय दिसला असता असं ते म्हणाले.

Devendra Fadanvis : नाकाखालून ४० आमदार गेले तरी बोध घेत नाही…

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी काळी मांजर आडवी गेली नाहीतर चिंचवडमध्ये आमचा विजय असता अशी टीका केली, त्यावर राहुल कलाटे म्हणाले की, मी वरिष्ठ नेत्यांबद्दल काही बोलणार नाही, मग ते अरविंद सावंत असू द्या किंवा अजित पवार द्या मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही असंही ते म्हणाले.

महाविकास आघाडीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलायला नको होतं. नवीन आमदारांनाही शुभेच्छा देतो. नाराजी व्यक्त करण्याची ही वेळ नाही. मला मतदान केलेल्यांचंही धन्यवाद आणि माझ्यासाठी पळालेल्या कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो. पुढच्या वर्षी पुन्हा निवडणूक होणारंय आणि मी पुन्हा त्याचं जोमानं कामाला लागणार आहे. आपल्या पाठीशी पुन्हा शिवसेनेचे वरिष्ठ नेते खंबीरपणे उभे राहिले पाहिजे त्याच्यावरच पुढचं सर्वकाही ठरणार असल्याची प्रतिक्रीया चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube