अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीचं पाऊल, गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड
NCP च्या महानगरपालिका गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड झाली.
NCP’s step for Ahilyanagar Municipal Corporation, Prakash Bhaganagare unanimously elected as group leader :
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या महानगरपालिका गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजेत्या सर्व २७ नगरसेवकांची बुधवारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी झाली. यावेळी गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संपत बारस्कर यांनी प्रकाश भागानगरे यांचा सत्कर करून अभिनंदन केले.
पिकनिकला ते माझ्याशिवाय जाऊ शकत नाही; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोला
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, प्रकाश भागानगरे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा शहराच्या विकासासाठी निश्चितपणे होईल. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून आणि समस्त कार्यकर्त्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
पेन्शनधारकांना 2030 सालापर्यंत मिळत राहणार पैसे; नेमका काय आहे सरकारचा निर्णय?
यावेळी नूतन गटनेते प्रकाश भागानगरे म्हणाले, स्व.अरुणकाका जगताप यांच्या आशीर्वादाने व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मला पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी पार पाडताना सर्व नगरसेवक तसेच पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वसात व बरोबर घेऊन काम करू. महानगरपालिकेत सर्व नगरसेवकांचे तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करू.
लेट्सअप विशेष : भाजपचा मास्टर स्ट्रॅटेजिस्ट! तावडे बिहारप्रमाणे केरळमध्येही तोच करिष्मा दाखवू शकणार?
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सागर बोरुडे, दिपाली बारस्कर, संपत बारस्कर, महेश तवले, संध्या पवार, ज्योती गाडे, गौरी बोरकर, काजल भोसले, हरप्रीतकौर गंभीर, मोहित पंजाबी, सुनिता भिंगारदिवे, कुमार वाकळे, अशा डागवाले, सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटिया, गणेश भोसले., अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुनिता फुलसौंदर, मीना चोपडा, पोर्णिमा गव्हाळे, गीतांजली काळे, सुनीता कांबळे, वर्षा काकडे, मयूर बांगरे व अश्विनी लोंढे आदी उपस्थित होते.
