राहुल कलाटे भाजप प्रवेश : फडणवीसांच्या निर्णयाला शत्रुघ्न काटेंनी विरोध करताच पक्षाचा सूचक इशारा
Rahul Kalate आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Rahul Kalate BJP Joining Update : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक दिग्गज नेते उद्या (दि.20) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. परंतु, राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना भाजपमध्ये घेतल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ, असा इशारा देणाऱ्या पक्षातील विरोधकांना अकारण विरोध करू नका अशी सणसणतीत चपराक वजा सूचक इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे कलाटेंना जरी पक्षात घेण्यासाठी पक्षातूनच विरोध होत असला तरी हा विरोध डावलून पक्षश्रेष्ठी कलाटेंना पक्षात घेण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
पाच सर्व्हेतील ‘बॅकबेंचर्स’ ना भाजपाचा ‘STRICT NO’; पण, माजी नगरसेवकांचं दादांकडून ग्रँड ‘वेलकम’
फडणवीस अन् मोहोळ बिझी म्हणून…
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे विरोधीपक्षातील अनेक इच्छूकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार पक्का केला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.18) हा जाहीर प्रवेश होणार होता. परंतु, मुरलीधर मोहोळ यांना दिल्लीत प्रश्नोत्तरांचे सत्र होते. त्यानंतर शिवसेनेसोबतची पुण्यातील जागा वाटपांसंदर्भातील कोअर कमिटीची बैठकदेखील लांबली. तर, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) रवींद्र चव्हाणांच्या घरी रात्रीच्या सुमारास आमंत्रणावरून जेवणासाठी गेले होते. त्यामुळे कलाटेंसह अन्य नेत्यांचा नियोजित असलेला भाजप पक्षप्रवेश सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता हा प्रवेश उद्या (दि.20) मुंबईत पार पडणार आहे.
जगताप अन् काटेंचा विरोध डावलून कलाटेंचा पक्षप्रवेश होणार
राहुल कलाटे तुतारीची साथ सोडून हाती कमळ घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, उद्या (दि.20) त्यांचा भाजपात प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे चिंचवडमधील आमदार शंकर जगतपांच्या विरोधात कलाटे यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे जगतापांसह शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कलाटे यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध केला आहे. पण या दोन्ही नेत्यांची नाराजी अंगावर घेत कलाटे यांना भाजपात घेतले जात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी चिंचवडसाठी दादांनी कंबर कसली; पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादीकडून राहुल कलाटेंना संपर्क
काटेंचा चव्हाणांना भेटण्याचा प्रयत्न पण…
राहुल कलाटे यांना भाजपात घेऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही भेटायचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. परंतु, काटेंना चव्हाणांची भेट मिळाली नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पक्षातील वरिष्ठ नेत्यांना डावलून कलाटेंना भाजपात प्रवेश दिला जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
अजित पवारांचा ‘एकला चलो’चा मोठा डाव; पुण्यात वेगळ लढण्याच्या निर्णयाने काय होणार?
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या 22 जणांमध्ये कोण-कोण?
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही दिग्गज नेत्यांचा भाजप प्रवेश मुंबईत होणार आहे. प्रवेश करणाऱ्यांची संख्या 22 असल्याचे सांगितले जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राहुल कलाटे, शरद पवारांचे आमदार बापू पठारेंचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांचे पुत्र हेमंत बागुल, शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, संतोष भरणे, मिलिंद पन्हाळकर, प्रकाश पवार, योगेश मोकाटे, रश्मी भोसले, दत्ता बहिरट आदींसह एकूण 22 जण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
