‘तत्पर’ निवडणूक आयोगाचं कौतुक अन्…, रिकाम्या गाड्यांची तपासणी करताच रोहित पवारांचा टोला
Rohit Pawar On Maharashtra Election Commission : राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू
Rohit Pawar On Maharashtra Election Commission : राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्यात लागू असणाऱ्या आचारसंहितेमुळे राज्य निवडणूक आयोगाचे भरारी पथक वाहनांची तपासणी करत असून आज पिंपरी – चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
तर आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत टोला लावला आहे. सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांचीही तपासणी होत नाही मात्र आमच्या रिकाम्या गाड्यांची कसून तपासणी करण्यात येते असा टोला आमदार रोहित पवार यांनी राज्य निवडणूक आयोगाला (Maharashtra Election Commission) लावला आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार आज मुंबईवरुन हेलिकॉप्टरने बैठकीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) येणार होते. शहरातील एका कंपनीच्या हेलिपॅडवर त्यांचा हेलिकॉप्टर उतरणार होता. त्याठिकाणी रोहित पवार यांना घेण्यासाठी आलेल्या वाहनांची राज्य निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपसाणी करण्यात आल्याने आता रोहित पवार यांनी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करत राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांच्याकडे पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून देण्यात आली आहे.
‘कार्यक्षम’ आणि ‘तत्पर’ निवडणूक आयोगाचं कौतुक आणि कमाल वाटते…
सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांचीही तपासणी होत नाही, मात्र आमच्या रिकाम्या गाड्यांची कसून तपासणी होते..! pic.twitter.com/rjVdjP8OHG— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 25, 2025
काय म्हणाले रोहित पवार?
या प्रकरणात रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या बॅग तपासल्या जात नाही आणि आमच्या रिकाम्या गाड्या तापसल्या जातात अशी टीका रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे. कार्यक्षम’ आणि ‘तत्पर’ निवडणूक आयोगाचं कौतुक आणि कमाल वाटते. सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांचीही तपासणी होत नाही, मात्र आमच्या रिकाम्या गाड्यांची कसून तपासणी होते..! असं रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तर दुसरीकडे राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. नगरपंचायत आणि नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का देत बाजी मारली होती. तर आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
मोठी बातमी; नागपूरमध्ये होणार भाजप- शिवसेना युती ! चंद्रशेखर बावनकुळे लवकरच करणार घोषणा
महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्ष या निवडणुकीसाठी काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी युती आणि आघाडीसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
