मोठी बातमी; नागपूरमध्ये होणार भाजप- शिवसेना युती ! चंद्रशेखर बावनकुळे लवकरच करणार घोषणा
Nagpur Municipal Corporation Elections : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकीची घोषणा झाली असून 15 जानेवारी रोजी मतदान
Nagpur Municipal Corporation Elections : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकीची घोषणा झाली असून 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच युती आणि आघाडीसाठी पक्षांकडून समविचारी पक्षांसोबत चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे आता नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. युतीबाबत लवकरच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत पुढील तासात घोषणा करणार आहे.
तर दुसरीकडे नागपूर महापालिका निवडणूक (Nagpur Municipal Corporation Elections) स्वबळावर लढवण्याची इच्छा भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत होती मात्र वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटात युती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या युतीबाबत घोषणा झाल्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेसाठी भाजप शिवसेना शिंदे गटाला किती जागा देणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट मुंबई, ठाणे, पुणेसह राज्यातील इतर महत्वाच्या महापालिका निवडणुकीसाठी युती करणार आहे. तर काही ठिकाणी एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, माजी महापौर मिनाक्षी शिंदेंनी दिला राजीनामा-
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने शानदार कामगिरी केली होती. भाजपने 123 पेक्षा जास्त नगराध्यक्षांच्या जागांवर बाजी मारली होती आणि या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पक्ष म्हणून समोर आले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण ठरणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
