उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, माजी महापौर मिनाक्षी शिंदेंनी दिला राजीनामा
Meenakshi Shinde : ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर मिनाक्षी शिंदेंनी
Meenakshi Shinde : ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर मिनाक्षी शिंदेंनी महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून शाखाप्रमुख विक्रांत वायचळांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याने माजी महापौर मिनाक्षी शिंदे नाराज असून त्यांनी शिवसेना शिंदे गट महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
ठाणाच्या राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार, विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदेंचे (Meenakshi Shinde) निकटवर्तीय असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पक्षविरोधी कारवाई केल्या प्रकरणी ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 3 मधील शाखाप्रमुख विक्रांत वायचळ (Vikrant Waichal) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाच्या या कारवाईनंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मोठा निर्णय घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ठाण्यात शिवसेना स्वबळावर?
तर दुसरीकडे ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. सध्या भाजपसोबत युतीसाठी चर्चा सुरु आहे. मात्र दोन्ही पक्षाकडून जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याने ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची देखील तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिका निवडणुकीसाठी राज्यातील सर्व महापालिकांसोबत 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
माझं कायम तुला सहकार्य अन्…, सनी निम्हण यांनी सांगितला फडणवीसांचा ‘तो’ किस्सा
