Ram Shinde : राम शिंदेंनी विधानसभेचा बदला घेतला… रोहित पवारांना जामखेडकरांनी नाकारलं

Ram Shinde : राज्यातील नगरपालिका नगरपंचायती निवडणूक पार पडल्या असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले मात्र या सगळ्यांमध्ये राज्याचे

  • Written By: Published:
Ram Shinde

Ram Shinde : राज्यातील नगरपालिका नगरपंचायती निवडणूक पार पडल्या असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले मात्र या सगळ्यांमध्ये राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पवार विरुद्ध शिंदे या प्रतिष्ठेच्या सामन्यांमध्ये राम शिंदे यांनी रोहित पवारांना पराभवाची धूळ चाकवत कर्जत पाठोपाठ जामखेड नगर परिषदेवर देखील भाजपचं कमळ फुलवलं. यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेत शिंदे यांनी रोहित पवारांसाठी आगामी काळात मोठे तगडे आव्हान निर्माण केले असल्याचे देखील आता बोलले जात आहे.

अहिल्यानगरच्या जामखेड नगरपरिषद (Jamkhed Municipal Council) निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवला तसेच भाजपने तब्बल 15 जागांवरती विजय मिळत नगराध्यक्ष पदही आपल्या ताब्यात घेतले. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या लढाईमध्ये रोहित पवारांना (Rohit Pawar) पराभवाला सामोरे जावे लागले व दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा जो पराभव झालेला होता कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून राम शिंदे (Ram Shinde) यांनी पुन्हा एकदा मतदार संघामध्ये कमबॅक केल्याचा आता बोलले जात आहे.

जामखेडमध्ये नेमकं काय घडलं ?

विधानसभा निवडणूक असू अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा अत्यंत प्रतिष्ठेचा सामना मानला जातो. यातच जामखेड नगरपंचायतीसाठी राम शिंदे हे मतदारसंघाचा तळ ठोकून होते. दुसरीकडे रोहित पवारांनी देखील विजयासाठी कंबर कसली होती. भाजपकडून प्रांजल चिंतामणी तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून संध्याराळे भात या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी होत्या मात्र चिंतामणी यांनी राळेभात यांचा पराभव करत जामखेड करांनी पुन्हा एकदा राम शिंदे यांच्या नेतृत्वावरती मोहरमटवली. जामखेडमध्ये भाजपची लाट पाहायला मिळाली एकूण जागांपैकी 15 जागांवरती भाजपचे उमेदवार विजयी झाले तर रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ पाच जागांवरती समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडीला दोन तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक व अजित पवारांचे राष्ट्रवादीला एक यामध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला.

विधानसभेची परतफेड

2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना झाला मात्र दोन्हीही वेळेस रोहित पवार यांनी राम शिंदे यांना पराभूत केले त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभव हा शिंदे यांच्या चांगला जिव्हारी लागला. पराभवानंतरही भाजपकडून शिंदेंचे पुनर्वसन करण्यात आले मात्र झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी शिंदे संधीची वाट पाहत होते अखेर कर्जत नगरपालिकेवरती भाजपचा झेंडा रोवल्यानंतर जामखेडकडे लक्ष देत या निवडणुकीतही राम शिंदे हे वरच ठरले असून यामुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. एक प्रकारे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची सुरुवात राम शिंदे यांनी केली आहे असं बोललं जातंय.

2029 रोहित पवारांसाठी कठीण?

विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजप हा मोठा पक्ष ठरला त्या पाठोपाठ झालेल्या नगरपालिका नगरपंचायती निवडणुकांमध्ये देखील भाजपचे चांगलेच वारे वाहत आहे. यामुळे येणाऱ्या 2029 निवडणूकमध्ये जर पुन्हा राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना झाला तर भाजपमय असलेले वातावरण व शिंदे यांच्या नेतृत्वाला मानणारा वर्ग यामुळे रोहित पवारांना येणारा काळ हा मोठा संघर्षाचा असणार असे चित्र सध्या मतदारसंघात निर्माण झाले.

‘तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका’ युतीच्या घोषणेवेळी महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंचा संदेश

व्यथित रोहित पवारांनी काँग्रेसवर पडले पराभवाचे खापर

जामखेड नगर पालिकेमध्ये झालेल्या पराभवामुळे व्यतीत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस वरच पराभवाचे खापर फोडले. काँग्रेसने भाजपची बी टीम बनून जातीयवादी शक्तींना मदत केल्याचा कळबळ जनक दावा यावेळी रोहित पवारांनी केलं. यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी एक संघ राहणार की नाही यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

follow us